प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, दुरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पडताळणी
प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आम्ही यासंदर्भात पडताळणी करण्यास सुरुवात केली. यासाठी काही किवर्डसच्या साहाय्याने शोध सुरु केला असता फेसबुकवर याच दाव्याच्या अनेक एक पोस्ट आढळून आल्या.



या फेसबुक पोस्टमध्ये webnewswala.com या वेबसाईटचा उल्लेख असल्याने आम्ही या वेबसाईटला भेट दिली पण तिथे आम्हाला प्रदीप भिडे यांच्या निधनाची बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही मुख्य प्रवाहातील माध्यमांत बातमी प्रसिद्ध झाली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अशी बातमी दिसली नाही. मात्र आम्हाला शिवसेनेच्या नेत्या डाॅ. मनीषा कायंदे यांचे 15 जुलै रोजीचे ट्विट आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे की, प्रदीप भिडे सुखरुप आहेत, चुकीच्या माहितीच्या आधारे ट्टिट केले होते.
यावरुन हे स्पष्ट झाले की प्रदीप भिडे यांच्या निधनाची अफवा व्हायरल झाली होती ती मनिषा कायंदे यांनी देखील शेअर केली होती. आम्ही याबाबत अधिक शोध घेतला असता माय महानगर या वेबसाईटवर देखील भिडे यांच्या निधन झाल्याची अफवा असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय आम्हाला वैभवी भिडे यांची एक फेसबुक पोस्ट आढळून आली. त्यात त्यांनी खोटी माहिती पसरवल्याबद्दल वेबन्यूज वाला या वेबसाईटच्या संपादकांच्या नावाने नोटीस शेअर केली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, प्रदीप भिडे यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
Source
- Google Search
Result- False
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)