Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeFact CheckFact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर...

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
अमेरिकेने 19 फेब्रुवारी हा दिवस जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केला असून 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो घालण्यात आला आहे.

Fact
अमेरिकेने 19 फेब्रुवारीला छत्रपति दिन घोषित केलेला नाही शिवाय 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापलेले नाही.

अमेरिकेने 19 फेब्रुवारी हा जागतिक छत्रपती दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले तसेच 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील छापला आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात केला जात आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून हा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे.

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे
Whatsapp Viral Message

आम्हाला ट्विटर आणि फेसबुकवर अशा अनेक जुन्या पोस्ट पाहायला मिळाल्या.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे

Fact Check/ Verification

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतासाठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे अमेरिकेने घोषित केले आहे की 19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती दिन म्हणून पाळला जावा कारण या दिवशी जगतविख्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. याबद्दल अमेरिकेचे विशेष आभार हा संदेश आपणास जेवढा पसरविता येईल जेवढा पसरवा.भारताला मिळालेला हा शिवराय यांच्यामुळे आणखी एक मोठा सम्मान आहे. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र  जे काम भारतात व्हायला पाहिजे होते ते काम अमेरिकेने करुन दाखवले.” पोस्ट सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेली 100 डाॅलरच्या नोटाचा फोटो देखील यात शेअर करण्यात आला आहे.

अमेरिकेने खरंच छत्रपती दिनाची घोषणा केली आहे का आणि शिवाजी महाराजांची 100 डाॅलरची नोट छापली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र आम्हाला अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही. अमेरिकेने जर खरंच असा काही निर्णय घेतला असता तर ती मोठी बातमी ठरली असती मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांत किंवा भारतीय माध्यमांत अशी बातमी आढळली नाही.

अमेरिकेत एखादा विशेष दिन घोषित करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला देण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोड ऑफ रेग्युलेशन 19.4 नुसार, अमेरिकेत विशेष दिन अथवा कार्यक्रम घोषित करण्यात येतो. मात्र यासाठी  किमान 60 दिवसांच्या आधी व्हाईट हाऊसमधील मेनेजमेंट व बजेट ऑफिसचे संचालकांकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. मग तो प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांकडे पाठवला जातो. राष्ट्राध्यक्षांच्या सही नंतर त्याची घोषणा करण्यात येते. जागतिक दिन ठरवण्याचा अधिकार अमेरिकेला नाही, संयुक्त राष्ट्रातर्फे (UN) जागतिक दिन घोषित करण्यात येतात.

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे
Screengrab of govinfo.gov

यावरुन हेच स्पष्ट होते की अमेरिकेने छत्रपती दिनाची घोषणा केलेली नाही मग 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आले कसे असा प्रश्न पडतो. आम्ही याबाबत पडताळणी करण्यास सुरुवात केली. गूगलवर काही किवर्डसच्या सहाय्याने शोध घेतला असता आम्हाला आढळले की अमेरिकेत 1914 मध्ये सर्वप्रथम शंभर डॉलरची नोट चलनात आली. त्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती राहिलेले बेंजमिन फ्रँकलिन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो कायम ठेवण्यात आला. आहे.

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे
Screengrab of uscurrency.gov

मात्र आम्ही शोध सुरुच ठेवला असता अशी एक वेबसाईट आढळून आली यात तुम्ही तुमचा फोटो देखील 100 डाॅलरच्या नोटेवर छापू शकता अशी सोय करण्यात आली आहे. या नोटेचा नंबर मात्र एकच आहे. त्याच नंबरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापण्यात आले आहे. याचा अर्थ ती खरी नोट नाही.

Fact Check: अमेरिकेने घोषित केला जागतिक छत्रपती दिन आणि 100 डॉलरच्या नोटेवर महाराजांचा फोटो? व्हायरल दावा खोटा आहे

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात हेच स्पष्ट होते की, अमेरिकेने 19 फेब्रुवारीला छत्रपति दिन घोषित केलेला नाही, शिवाय 100 डाॅलरच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापलेले नाही. सोशल मीडियावर खोटी पोस्ट व्हायरल होत आहे.

Result: False

Our Sources
Google Search
Code of Federal Regulations
Information published on uscurrency.gov

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular