Authors
Claim
हिंदू विद्यार्थ्यांनी हिजाब घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर अत्याचार केला.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ इंडोनेशियातील मुहम्मदिया नीड मिडल स्कूलचा (Muhammadiyah Need Middle School) असून, त्याचा भारताशी कोणताही संबंध नाही.
हिंदू विद्यार्थ्यांनी हिजाब घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून केला जात आहे.
महाविद्यालये आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अकारण त्रास देण्याच्या घटना सर्रास घडतात. काहीवेळा अशा प्रकरणांमध्ये, पीडितांवर क्रूरता झाल्याच्या बातम्याही येतात. अलीकडेच शाळांमध्ये हिजाबवरून झालेल्या वादानंतर अनेक तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांमध्ये वैमनस्य वाढण्याची भीती व्यक्त केली होती. याच क्रमाने, सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यात हिंदू विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे.
Fact Check/Verification
हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर हिंदू विद्यार्थ्यांनी अत्याचार केल्याच्या नावाखाली शेअर केलेल्या या व्हिडिओचा तपास करण्यासाठी आम्ही गुगलवर त्याची एक मुख्य फ्रेम शोधली. या प्रक्रियेत, आम्हाला माहिती मिळाली की व्हायरल व्हिडिओ हा भारतातील नसून इंडोनेशियातील एका शाळेचा आहे, जिथे 2020 मध्ये एका विद्यार्थ्यावर झालेल्या अत्याचारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
सेंट्रल जावाचे तत्कालीन गवर्नर Ganjar Pranowo यांनी शेअर केलेले ट्विट प्राप्त झाले, ज्यात त्यांनी या घटनेची दखल घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
याव्यतिरिक्त, आम्हाला 13 फेब्रुवारी 2020 रोजी Republika आणि Tribunnews.com द्वारे प्रकाशित लेख प्राप्त झाले, ज्यामध्ये इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा प्रांतातील पुरवरेजो (Purworejo) शहरातील शाळेतील अत्याचार असे या घटनेचे वर्णन केले गेले. Tribunnews.com ने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांची नावे समोर आल्याची माहिती दिली आहे.
महत्वाचे म्हणजे 19 फेब्रुवारी 2020 रोजी Detik News आणि 17 फेब्रुवारी 2020 रोजी Kompas.com ने प्रकाशित केलेल्या लेखांमध्ये, व्हिडिओचे वर्णन इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा प्रांतातील पुरवरेजो (Purworejo) शहरातील मुहम्मदिया नीड मिडल स्कूल (Muhammadiyah Need Middle School) येथील असे करण्यात आले आहे.
Conclusion
अशा प्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट होते की हिंदू विद्यार्थ्यांकडून हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या नावाखाली शेअर केलेला हा दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा प्रांतातील पुरवरेजो (Purworejo) शहरातील मुहम्मदिया नीड मिडल स्कूलचा (Muhammadiyah Need Middle School) आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या घटनेबाबत प्रसिद्ध झालेल्या एकाही प्रसारमाध्यमातील वृत्तात या प्रकरणी सांप्रदायिक अँगलचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
Result: False
Our Sources
Media reports
Tweet shared by former Central Java Governor on 12 February, 2020
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in न्यूजचेकरचे चॅनल WhatsApp वर Live चालू आहे.