Authors
येत्या २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यामुळे मागील आठवड्यात यासंदर्भात निगडित असंख्य दावे व्हायरल झाले. राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत, असा दावा करण्यात आला. श्रीराम आणि राममंदीरचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आली आहे, असा दावा करण्यात आला. बाबरी मशीद पाडविण्यात आलेली जागा भग्न अवस्थेत पडून आहे आणि अयोध्येत या जागेपासून तीन किलोमीटर दूर राम मंदिर उभारण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात जल्लोष करण्यासाठी फटाके वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचा दावा करण्यात आला. काश्मीरच्या लाल चौकात रामाची प्रतिमा लावलेली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
मोदी आणि योगी संपूर्ण भारताला देताहेत फ्री मोबाईल रिचार्ज?
राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
श्रीराम आणि राम मंदीराचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आली नाही
श्रीराम आणि राममंदीरचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
मूळ जागेपासून राम मंदिर तीन किलोमीटर दूर उभारले?
बाबरी मशीद पाडविण्यात आलेली जागा भग्न अवस्थेत पडून आहे आणि अयोध्येत या जागेपासून तीन किलोमीटर दूर राम मंदिर उभारण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.
त्या फटाक्यांच्या ट्रकचा राम मंदिर जल्लोषाशी संबंध नाही
राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात जल्लोष करण्यासाठी फटाके वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
ते भगवान रामाचे चित्र काश्मीरच्या लाल चौकातील नाही
काश्मीरच्या लाल चौकात रामाची प्रतिमा लावलेली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा