दावा- मध्यप्रदेशातील माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप लोकशाहीची हत्या करण्यात एक्सपर्ट असल्याचे वक्तव्य केले आहे.
काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले मध्यप्रदेशातील माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात सिंधिया भाजपा लोकशाहीची हत्या करण्यात एक्सपर्ट असल्याचे सांगत आहेत. या व्हिडिओ विषयी दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ आत्ताचा आहे.

पडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी केली असता आम्हाला हाच दावा करणारे टविट आढळून आले. यात म्हटले आहे की भाजपने कशी लोकशाहीची हत्या केली , लोकशाहीचे सरकार कसे पाडले हे सिंधिया स्वत: सांगत आहेत. तर पुढे ट्विटमध्ये कुणाला किती मिळाले हे देखील जनतेला सांगितले असते तर बरे झाले असते असा प्रश्न देखील केला आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खरंच असे वक्तव्य केले आहे का याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी पडताळणी सुरुच ठेवली. यासाठी आम्ही गूगमध्ये शोध घेतला आम्हाला सध्यातरी कोणतेही वक्तव्य केल्याची बातमी आढळून आली नाही. आम्ही सिंधिया यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता त्यांच्या चेह-यावरती मास्क नसल्याचे तसेच त्यांच्या सोबत किंवा पाठीमागे उभे असलेल्या लोकांनी सुद्धा मास्क लावलेला दिसला नाही. तसेच शारीरिक अंतराचे पालन केले नसल्याचे आढळून आले. यावरुन हा व्हिडिओ जुना असल्याची शंका निर्माण झाली. व्हिडिओत न्यूज18 मध्यप्रदेश छत्तीसगड या वृत्तवाहिनीचा लोगो आहे.

काही किवर्डसचा वापर करुन आम्ही न्यूज18 मध्यप्रदेश छत्तीसगडच्या बातमीचा व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली असता आम्हाला 22 जानेवारी 2019 रोजीची न्यूज18 हिंदीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. या बातमीत कांग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्यप्रदेशातील गुना या आपल्या मंतदारसंघात पत्रकार परिषदेत भाजप लोकशाहीची हत्या करण्यात एक्सपर्ट असल्याचा आरोप केल्याचे म्हटले आहे.

याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या 22 जानेवारी 2019 च्या पत्रकार परिषदेच्या बातमीचा व्हिडिओ देखील आम्हाला आढळून आला.
यावरुन हेच स्पष्ट होते की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाच प्रवेश केल्यानंतरचा त्यांचा हा व्हिडिओ नाही. सिंधिया कांग्रेसचे खासदार असताना त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर आरोप केले होते. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ मीडियात चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Source
Twitter FacebookGoogle
Result- Misleading/partly false
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)