Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक क्लेम व्हायरल झाले. अयोध्या राममंदिराचे दानपात्र अर्ध्या दिवसात भरले, असा दावा करण्यात आला. महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. मीरा रोडच्या घटनेनंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांना बेदम मारहाण केली. असा दावा करण्यात आला. व्हिडिओमध्ये तलवारबाजी करताना दिसणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत. असा दावा करण्यात आला. ‘मेरे घर राम आये हैं’ गाण्यावर नृत्य करणारी ही महिला ओडिशाच्या संबलपूरची जिल्हाधिकारी अनन्या दास आहे. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
अयोध्या राममंदिराचे दानपात्र अर्ध्या दिवसात भरले?
अयोध्या राममंदिराचे दानपात्र अर्ध्या दिवसात भरले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली?
महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
त्या व्हिडिओचा मीरा रोड घटनेशी संबंध नाही
मीरा रोडच्या घटनेनंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांना बेदम मारहाण केली. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
तलवारबाजी करताना दिसणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री?
व्हिडिओमध्ये तलवारबाजी करताना दिसणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
ही महिला ओडिशाच्या संबलपूरची जिल्हाधिकारी अनन्या दास नाही
‘मेरे घर राम आये हैं’ गाण्यावर नृत्य करणारी ही महिला ओडिशाच्या संबलपूरची जिल्हाधिकारी अनन्या दास आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा