Sunday, June 16, 2024
Sunday, June 16, 2024

HomeFact CheckViralनियोजित राम मंदिराच्या नावाने 'अक्षरधाम'चा फोटो व्हायरल

नियोजित राम मंदिराच्या नावाने ‘अक्षरधाम’चा फोटो व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

नियोजित राम मंदिराच्या प्रतिकृतीचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोविषयी दावा करण्यात येत आहे की, प्रभु श्रीरामाचे असे भव्य मंदिर निर्माण केले जाणार आहे.

https://www.facebook.com/photo?fbid=2671490919772779

संग्रहित

Fact Check / Verification

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला फोटो हा नियोजित राममंदिराच्या प्रतिकृतीचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याबाबत शोध घेत असताना आम्हाला न्यूज 18 हिंदी या न्यूज चॅनलच्या फेसबुक पेजवर देखील हा फोटो आढळून आला.

स्वामी नारायाण अक्षरधाम मंदिर नोएडा

फेसबुक/ संग्रहित

आम्ही सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या नियोजित राम मंदिराच्या फोटोविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने या फोटोचो शोध घेतला असता reddit.com वर हा फोटो आढळून आला. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा फोटो नवी दिल्लील, नोएडा येथील पांडवनगर परिसरात असेलल्या प्रसिद्ध स्वामी नारायण अक्षरधाम मंदिराचा असल्याचे म्हटले आहे.

यानंतर आम्ही स्वामी नारायण अक्षरधाम मंदिराच्या फोटोंचा शोध घेतला असता गूगलवर याचे अनेक रिझल्ट्स आढळून आले.

अक्षरधाम मंदिर दिल्ली

याशिवाय अक्षरधाम मंदिराच्या वेबसाईटवर देखील हे फोटो असल्याचे आढळून आले.

आम्ही व्हायरल फोटोची आणि अक्षरधाम मंदिराच्या फोटोची तुलना करुन पाहिली असता यात साम्य आढळून आले.

अक्षरधाम मंदिर

आम्ही राम मंदिराच्या नियोजित आराखडा आणि प्रतिकृतीच्या फोटोचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला Indian Express च्या वेबसाईटवर 26 जुलै रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात नियोजित राम मंदिराच्या थ्री डी प्रतिकृतिचा फोटो छापण्यात आला आहे.

Times Now या इंग्रजी न्यूज चॅनलने देखील नियोजित राम मंदिरासंदर्भात बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करणार असून यात नियोजत राममंदिराचे छायाचित्र व ग्राफिक्स देखील दाखवण्यात आले आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो हा नियोजित राम मंदिराचा नसून दिल्ली येथील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचा आहे. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने हा फोटो व्हायरल होत आहे. याआधीही राममंदिराच्या नावाने हा फोटो व्हायरल झाला होता.

Result: Misleading

Our Sources

Indian Express : https://indianexpress.com/article/india/ayodhya-2020-ram-temple-inauguration-pm-modi-6523446/

Times Now : https://www.timesnownews.com/india/article/bhavya-ram-mandir-blueprint-take-a-3d-look-into-the-design-of-the-coveted-ayodhya-temple-video/626036

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular