Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeFact CheckFact Check: तुम्हालाही भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक आली आहे? हा दिशाभूल...

Fact Check: तुम्हालाही भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक आली आहे? हा दिशाभूल करण्याचा एक प्रकार

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
खालील लिंकवर क्लिक करा आणि भारतीय पोस्ट सबसिडी योजनेचा लाभ घ्या.
Fact

भारत सरकार किंवा पोस्ट खात्याने अशाप्रकारची कोणतीही योजना सुरु केलेली नाही. संबंधित लिंक पाठवून दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु आहे.

भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक असल्याचे सांगून या योजनेचा लाभ घ्या. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check: तुम्हालाही भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक आली आहे? हा दिशाभूल करण्याचा एक प्रकार

सबसिडी योजनेचा संदेश असल्याने युजर्स हा मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल करीत आहेत.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही किवर्डसच्या माध्यमातून सर्च केला. आम्हाला यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. भारतीय टपाल खात्याने इतकी मोठी योजना जाहीर केलेली असताना याबद्दल माध्यमांमध्ये बातम्या येणे आवश्यक होते. मात्र तसे आढळले नाही.

व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आलेली http://jkxw.buzz/Rmweuae/11559925376156893568db9119 ही लिंक ब्राऊजरच्या माध्यमातून उघडून बघण्याचा प्रयत्न आम्ही केला, दरम्यान ही लिंक उघडू शकली नाही. यामुळे आम्ही स्कॅम डिटेक्टर या यंत्रणेच्या माध्यमातून सदर लिंकच्या विश्वासार्हतेबद्दल शोधले. स्कॅम डिटेक्टरला संबंधित वेबसाईट कमी विश्वासार्ह असल्याचे दिसून आले आहे. या वेबसाईटला २.९ हा सर्वात कमी रँक आहे. अतिशय नवीन, कमी विश्वासार्ह आणि असुरक्षित असा शेरा देण्यात आला आहे.

Fact Check: तुम्हालाही भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक आली आहे? हा दिशाभूल करण्याचा एक प्रकार
Screengrab of Scam Detector

यासंदर्भात आणखी शोधले असता, यासंदर्भात इकॉनॉमिक्स टाइम्सने २५ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. बनावट वेबसाइटसंदर्भात पोस्ट खात्याने नागरिकांना सावध केले असल्याची माहिती आम्हाला वाचायला मिळाली.

Fact Check: तुम्हालाही भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक आली आहे? हा दिशाभूल करण्याचा एक प्रकार
Screengrab of Economic Times

PIB फॅक्टचेक ने सुद्धा याबद्दल विशेष Press Release प्रसारित करून सबसिडीच्या नावाखाली सुरु असलेल्या बनावट मेसेजवर प्रकाशझोत टाकल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: तुम्हालाही भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक आली आहे? हा दिशाभूल करण्याचा एक प्रकार

दरम्यान भारतीय पोस्ट खाते सबसिडी लिंक या नावे प्रसारित होत असलेला संदेश खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.

Conclusion 

अशाप्रकारे आमच्या तपासात भारत सरकार किंवा पोस्ट खात्याने अशाप्रकारची कोणतीही योजना सुरु केलेली नाही. संबंधित लिंक पाठवून दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु आहे, हे स्पष्ट झाले.

Result: False

Our Sources
Result by Scam Detector
News published by Economic Times on April 25, 2022
Press release of PIB on April 23, 2022

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular