Tuesday, July 16, 2024
Tuesday, July 16, 2024

HomeFact Checkशिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने राम मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिल्याचा दावा व्हायरल

शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने राम मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिल्याचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने राम मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिंदीमध्ये व्हायरल होत असलेल्या पोस्टचा आम्ही अनुवाद केला. यात म्हटले आहे की, साई ट्रस्टने श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी दान देण्यासाठी नकार दिला, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. पण सत्य वेगळेच आहे, साई ट्रस्टमध्ये एक-एक पैसा हिंदूंनी दान केला आहे.

फेसबुक/ संग्रहित

फेसबुक/ संग्रहित

Fact Check / Verification

याबाबत आम्ही शोध सुरु केला असता आम्हाला शिर्डीच्या साई बाबा ट्रस्टने अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी देणगी देण्यास नकार दिल्याची बातमी आढळून आली नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये देणगीची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू झाली आहे. देणग्याशी संबंधित व्हायरल संदेश 5 जानेवारीपासून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला गेला आहे की साई मंदिर ट्रस्टने स्वत: ला अहिंदू घोषित केले आहे आणि रामजन्मभूमी ट्रस्टला देणगी देण्यास नकार दिला आहे.

अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही साईबाबा ट्रस्टच्या ट्विटर अकाउंटला भेट दिली मात्र आम्हाला राम मंदिर देणगी विषयीचे कोणतेही ट्विट आढळून आले नाही. तसचे आम्ही ट्रस्टच्या फेसबुक पेजला भेट दिली मात्र तेथे देखील याबबात माहिती मिळाली नाही.

मात्र ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच बगाटे यांनी माध्यमांना दिललेली पच्क्रिया आढळून आली यात त्यांनी म्हटले आहे की, अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून साईबाबा ट्रस्टला देणगी देण्याबाबत विचारणा करण्यात आलेली नाही. शिवाय साईबाबा ट्रस्ट ने स्वत: देखील देणगी देण्यास नकार दिलेला नाही.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य बिमलिंदर मोहन प्रताप मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ट्रस्टकडून शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टला देणगी देण्याची विनंती केलेली नाही. व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा खोटा आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, गुड माॅर्निंग मॅसेज इमेजेस डाऊनलोड केल्याने बॅंक अकाउंट रिकामे होत असल्याचा दावा चुकीचा आहे. अशी घटना सध्या तरी आढळून आलेली नाही.

Result – False

Our Sources

साईबाबा ट्रस्ट- https://twitter.com/ssstshirdi

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular