Authors
Claim
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे जाहीर केलेले टप्पे पाच असून निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे, असे सांगणारा एक दावा सोशल मीडियावर व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/Verification
व्हायरल इमेजचा मूळ स्रोत शोधण्यासाठी आम्ही Google वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला, मात्र संबंधित इमेजबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
तपासासाठी आम्ही ‘लोकसभा निवडणूक महाराष्ट्र टप्पे’ असा शोध घेतला असता, आम्हाला बीबीसी मराठीने १६ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली माहिती मिळाली. यामध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. अशी माहिती देताना प्रत्येक टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात मतदान होणार याची माहिती देण्यात आल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. माहितीनुसार,
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
अशी निवडणूक प्रक्रिया असेल.
आम्ही यासंदर्भात आणखी शोधताना लोकसत्ता ने १६ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी आम्हाला वाचायला मिळाली. या बातमीत सुद्धा महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार अशीच माहिती आम्हाला मिळाली.
निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये दिलेल्या माहितीत सुद्धा महाराष्ट्रातील पाच निवडणूक टप्प्यांचा तपशील देण्यात आला आहे.
यावरून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत. ही माहिती मिळाली.
Conclusion
यावरून आमच्या तपासात महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार हा दावा खोटा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे जाहीर केलेले टप्पे पाच असून निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे. हे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
News published by BBC Marathi on March 16, 2024
News published by Loksatta on March 16, 2024
Video published by ECI on March 16, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा