Authors
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा हा मुख्यतः मुस्लिमांच्या हिताचा विचार करणारा असल्याचा दावा करण्यात आला. राहुल गांधींच्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथे हिरवे झेंडे घेतलेले व्हिज्युअल्स पाहायला मिळाले, असा दावा करण्यात आला. हरियाणातील सिरसा येथे भाजप उमेदवार अशोक तंवर यांच्या विरोधात लोकांनी निदर्शने केली, असा दावा करण्यात आला. जनतेला लुटण्याच्या १०१ आयडिया नावाचे पुस्तक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रकाशित केले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
काँग्रेसचा जाहीरनामा हा मुख्यतः मुस्लिमांच्या हिताचा?
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा हा मुख्यतः मुस्लिमांच्या हिताचा विचार करणारा असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
ही स्थिती राहुल गांधींच्या मतदारसंघातील नाही
राहुल गांधींच्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथे हिरवे झेंडे घेतलेले व्हिज्युअल्स पाहायला मिळाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
हरियाणातील सिरसा येथे भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली?
हरियाणातील सिरसा येथे भाजप उमेदवार अशोक तंवर यांच्या विरोधात लोकांनी निदर्शने केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
जनतेला लुटण्याच्या १०१ आयडिया नावाचे पुस्तक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रकाशित केले?
जनतेला लुटण्याच्या १०१ आयडिया नावाचे पुस्तक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रकाशित केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा