Authors
Claim
इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स.
Fact
हा व्हिडीओ गेमिंगचा आणि करमणुकीसाठी बनविण्यात आलेला आहे.
इराण आणि इस्रायलमधील युद्धावरून सध्या सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. याच क्रमाने इराणचा इस्रायलवर हल्ला झालेला व्हिडीओ म्हणून एक व्हिडीओ शेयर केला जात आहे.
या दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“इराणने 185 ड्रोन, 150 बॅलिस्टिक, 36 क्रूझ मिसाईल इस्रायलवर सोडले. त्यातील फक्त 7 बॉर्डर पार करू शकले.” असे हा दावा सांगतो.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओच्या तपासासाठी आम्ही त्याच्यासंदर्भात किवर्ड सर्च केला. दरम्यान इराण आणि इस्रायल युद्धाचे म्हणून शेयर केल्या जाणाऱ्या अधिकृत व्हिडिओंमध्ये आम्हाला हा व्हिडीओ किंवा त्यासंदर्भात शेयर केली जात असलेली माहिती मिळाली नाही.
दरम्यान तपासासाठी आम्ही संबंधित व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर Google वर रिव्हर्स इमेज सर्च केला.
आम्हाला १४ एप्रिल रोजी @gautamaggarwal856 या युट्युब चॅनलने हाच व्हिडीओ अपलोड केला असल्याचे पाहायला मिळाले. आम्ही व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यावर आम्हाला चिनी भाषेत लिहिलेला एक मजकूर आढळला.
आम्ही गुगल लेन्स च्या माध्यमातून या मजकुराचे इंग्रजी भाषांतर शोधले.
“Game images for entertainment purposes only” अर्थात “करमणुकीसाठी बनविण्यात आलेल्या गेम इमेजीस” असा त्याचा अर्थ असल्याचे निदर्शनास आले. यावरून हा व्हिडीओ गेमिंगचा आणि करमणुकीसाठी बनविण्यात आलेला आहे, हे आमच्या लक्षात आले.
चिनी भाषा असल्याने आम्ही या व्हीडीसंदर्भात Yandex वर देखील शोधले, मात्र या व्हिडिओचा मुख्य स्रोत मिळाला नाही.
आणखी शोध घेत असताना आम्हाला संबंधित व्हिडीओ हा १३ डिसेंबर २०२३ रोजीही टेलिग्रामवर शेयर करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
यावरून सदर व्हिडीओ डिसेंबर २०२३ पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. मात्र संबंधित व्हिडिओचा मुख्य स्रोत शोधण्यात आम्ही यशस्वी झालो नाही.
Conclusion
यावरून आमच्या तपासात इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स म्हणून शेयर होत असलेला हा व्हिडीओ गेमिंगचा आणि करमणुकीसाठी बनविण्यात आलेला आहे, हे स्पष्ट झाले.
Result: False
Our Sources
Self Analysis
Google search
Google Lense
Video published by @gautamaggarwal856 on April 14, 2024
Video posted on Teligram on December 13, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा