Authors
Claim
राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक आहेत असे लालकृष्ण अडवाणी म्हणाले.
Fact
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी असे विधान केलेले नाही. हा दावा खोटा आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक आहेत असे वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले. असा दावा केला जात आहे. एका न्यूजपेपरचे क्लिपिंग वापरून असा दावा केला जात आहे.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींबद्द्ल प्रशंसोद्गार काढल्याच्या दाव्याची तपासणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम संबंधित किवर्डस गुगलवर शोधले. मात्र असे विधान अडवाणी यांनी केल्याचे आम्हाला कोणत्याही अधिकृत मीडिया रिपोर्टमध्ये पाहायला मिळाले नाही. अडवाणी यांनी असे विधान कुठे, कधी आणि कोणत्या कार्यक्रमात केले याचा तपशील व्हायरल न्यूजपेपर क्लिपिंग मध्येही आम्हाला आढळला नाही. यामुळे एकंदर प्रकार आम्हाला संशयास्पद आढळला.
मराठी भाषेत असलेले संबंधित पेपर क्लिपिंग कोणत्या वृत्तपत्राचे आहे? याचा आम्ही शोध घेतला, मात्र योग्य माहिती मिळाली नाही. अखेर X वर याप्रकारची इतर भाषेतील पोस्ट शोधताना आम्हाला @INCArunachal या अकाउन्टने शेयर केलेली याचसंदर्भातील इंग्रजी पोस्ट मिळाली.
“Rahul Gandhi is the hero of Indian politics: Lal Krishna Advani (LK Advani).” या शीर्षकाखाली पोस्ट लिहिताना (http://avadhbhoomi.com) चा हवाला देण्यात आल्याचे आमच्या पाहणीत आले. संबंधित वेबसाईटवर यासंदर्भात काही माहिती मिळते का? हे आम्ही पाहिले. ,मात्र सदर लिंक वरील पोस्ट डिलीट करण्यात आलेली असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
दरम्यान संबंधित पोस्टच्या मुळाशी जाण्यासाठी इंटरनेटवर संबंधित पोस्टचे संग्रहण झाले आहे का? याचा आम्ही शोध घेतला. आम्हाला archive.today मध्ये संग्रहित केलेली मूळ पोस्ट पाहायला मिळाली.
संबंधित avadhbhumi.com च्या बातमीतील मजकूर आणि व्हायरल पोस्टमधील मराठी भाषांतरित मजकूर आम्हाला समान असल्याचे दिसून आले. दरम्यान avadhbhumi.com ने सदर पोस्ट डिलीट करण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न आम्ही सुरु केला. आम्हाला hindi.onlyfact.in ने यासंदर्भात केलेले फॅक्टचेक पाहायला मिळाले.
hindi.onlyfact.in ने तपासादरम्यान अवधभूमी मीडिया पोर्टलशी संपर्क केला. अडवाणी यांनी वैयक्तिक संभाषणात आपल्याला ही माहिती दिली आहे का? असा प्रश्न करताच अवधभूमीने याला नकार दिला. दरम्यान या बातमीचा स्रोत विचारला असता, “आम्ही ही बातमी वेबसाइटवरून हटवत आहोत.” अशी माहिती देण्यात आली आहे. असे आम्हाला वाचायला मिळाले.
यावरून अवधभूमी पोर्टलने ही बातमी कोणत्याही अधिकृत सूत्राशिवाय छापली आणि नंतर हटविली असल्याचे वास्तव समोर आले. आम्ही संबंधित वेबसाईटवर जाऊन अस्वीकरण विभागात पाहिले असता, “या वेबसाइटवरील सर्व माहिती – https://avadhbhumi.com/ – सद्भावनेने आणि केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केली आहे. avadhbhumi.com या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.” असे आम्हाला वाचायला मिळाले.
यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या कथित विधानाबद्दल avadhbhumi.com ने प्रसिद्ध करून डिलीट केलेली बातमी किंवा संबंधित बातमीचे भाषांतर करून छापलेल्या इतर समान बातम्यांना काहीच आधार आणि अधिकृत स्रोत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.
Conclusion
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक आहेत असे लालकृष्ण अडवाणी म्हणाले हा दावा खोटा आहे. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी असे विधान केलेले नाही.
Result: False
Our Sources
Self Analysis
Google Search
X post made by @INCArunachal on May 9, 2024
Archived link by archive.today
Factcheck published by hindi.onlyfact.in on May 9, 2024
Analysis of avadhbhumi.com
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in