Authors
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. काँग्रेस सत्तेवर आल्यास मुस्लिम धर्मगुरू हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहेत, असा दावा करण्यात आला. भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली, असा दावा करण्यात आला. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात मुस्लिम समाजाकडून खुलेआम गोहत्या करतानाचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
मुस्लिम धर्मगुरू हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहे?
काँग्रेस सत्तेवर आल्यास मुस्लिम धर्मगुरू हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली?
भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असे राहुल गांधी म्हणाले नाहीत
राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केली?
कर्नाटकात मुस्लिम समाजाकडून खुलेआम गोहत्या करतानाचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in