Authors
Claim
राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचा Google रिव्हर्स इमेज सर्च केला. यादरम्यान, आज तक द्वारे 10 मे 2024 रोजी पोस्ट केलेल्या यूट्यूब शॉर्टमध्ये व्हायरल क्लिपसारखी दृश्ये दिसली. Aaj Tak ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणत आहेत, ”नरेंद्र मोदी हिंदुस्तान का प्रधानमंत्री नहीं बन सकता है।” कानपूरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केल्याचे व्हिडिओसोबत सांगण्यात आले आहे.
आता आम्ही कानपूरमध्ये झालेल्या राहुल गांधींच्या रॅलीचा व्हिडिओ शोधला. आम्हाला 10 मे 2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीम केलेला व्हिडिओ सापडला. व्हिडिओमध्ये 46:04 मिनिटांनी, आम्हाला व्हायरल क्लिपचा भाग पाहायला मिळतो. पण लाइव्ह स्ट्रीम व्हिडिओमध्ये राहुल गांधी असे म्हणताना दिसत आहेत की, ”…2024, 4 जून, नरेंद्र मोदी हिन्दुस्तान के प्रधानमन्त्री नहीं रहेंगे! आप लिख के ले लो … आप लिख के ले लो… नरेंद्र मोदी जी हिन्दुस्तान के प्रधानमन्त्री नहीं बन सकते हैं! हमने जो करना था … जो काम … जो मेहनत करनी थी … वो कर दी है… अब आप देखना उत्तर प्रदेश में हमारे गठबंधन को 50 से कम एक सीट नहीं मिलने वाली है।…”
व्हायरल क्लिपमध्ये एडिट करून राहुल गांधींचे वक्तव्य बदलण्यात आले आहे. ”2024, 4 जून, नरेंद्र मोदी हिन्दुस्तान के प्रधानमन्त्री नहीं रहेंगे!” मधून ‘नहीं’ हा शब्द हटवला आहे, आणि ”अब आप देखना उत्तर प्रदेश में हमारे गठबंधन को 50 से कम एक सीट नहीं मिलने वाली है” मधून ’50 से कम’ हटविण्यात आले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने 10 मे 2024 रोजी राहुल गांधींच्या या रॅलीचे वृत्त दिले होते. ‘Rahul Gandhi Says ‘Good Bye’ To Modi; Says He Can’t Be India’s PM I Congress Kanpur Rally’ असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, रिपोर्टसोबत राहुल गांधी यांच्या भाषणाची क्लिपसुद्धा शेयर करण्यात आली आहे. ज्यामुळे हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.
तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, राहुल गांधींचा हा व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे.
Result: Altered Photo/Video
Sources
Live stream posted on the official You tube channel of Indian National Congress on 10th May 2024.
Report by Aaj Tak on 10th May 2024.
Report by Times of India on 10th May 2024.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in