Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून...

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
पीएम मोदींच्या हरियाणातील सभेत खुर्च्या रिकाम्या राहिल्या.
Fact

नाही, व्हायरल झालेला व्हिडिओ पुण्यात झालेल्या सभेचा आहे.

गेल्या शनिवारी हरियाणामध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की हा व्हिडिओ हरियाणाचा नसून, 29 एप्रिल रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेतील आहे. यावेळी व्हायरल झालेला व्हिडीओ रॅलीदरम्यानचा आहे की नंतरचा आहे हे कळू शकले नाही.

गेल्या शनिवारी पंतप्रधान मोदींनी हरियाणातील अंबाला आणि सोनीपत येथे सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राम मंदिर आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय हरियाणातील आप-काँग्रेस आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला आणि ते दोघेही इथे एकत्र फिरत आहेत तर पंजाबमध्ये एकमेकांवर हल्ले करत असल्याचे सांगितले.

व्हायरल व्हिडिओ सुमारे 27 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये रॅलीत रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत. याशिवाय पार्श्वभूमीत पीएम मोदींचे भाषण वाजताना दिसत आहे, त्यात ते असे बोलत आहेत, “जब तक मोदी है, इंडी अघाड़ी वालों की सारी साजिशें नाकाम करता रहेगा. साथियों, कांग्रेस शासन की एक और पहचान रही है. आतंकवादियों को खुली छूट. हम कैसे भूल सकते हैं वो समय जब”.

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी बोललेल्या शब्दांच्या मदतीने न्यूजचेकरने गुगलवर सर्च केले. या दरम्यान, narendramodi.in या वेबसाईटवर 29 एप्रिल 2024 रोजी पीएम मोदींनी पुणे सभेत दिलेल्या भाषणाचा संपूर्ण मजकूर आम्हाला मिळाला.

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा आहे

या मजकुरात व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित ऑडिओ भाग देखील समाविष्ट आहे. पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडले होते. “उन्होंने कर्नाटक में क्या किया रातों-रात सभी मुसलमानों को एक फतवा निकालकर ओबीसी बना दिया. सबको ओबीसी बना दिया. सर्कुलर निकाल दिया, ठप्पा मार दिया और जैसे ही वो रातों-रात ओबीसी बने सुबह ओबीसी के पास जो 27 परसेंट आरक्षण था उस पर डाका डालकर आधे से ज्यादा माल वो खा गए. ओबीसी वाले सारे लटकते रह गए. मुझे बताइए भाइयों, क्या देश में चलेगा क्या ऐसा? ये इंडी अघाड़ी वाले जरा कान खोलकर सुन लो.. मोदी अभी जिंदा है. ये कान खोलकर के सुन लो, शहजादे जब तक मोदी जिंदा है, धर्म के आधार पर आरक्षण नहीं होने देगा. यह देश नहीं होने देगा और जो ये मंसूबे रखते हैं उनको हमेशा-हमेशा के लिए ये देश राजनीति के नक्शे से मिटा देगा जी. जब तक मोदी है, इंडी अघाड़ी वालों की सारी साजिशें नाकाम वो करता रहेगा.” असे ते बोलले होते.

“साथियों कांग्रेस शासन की एक और पहचान रही है. आतंकवादियों को खुली छूट, हम कैसे भूल सकते हैं वो समय जब आए दिन देश में आतंकी हमले और बम ब्लास्ट होते थे. आतंकियों ने महाराष्ट्र के मुंबई और पुणे को लहूलुहान कर दिया था। जर्मन बेकरी के सामने क्या हुआ था?” असेही ते पुढे म्हणाले.

आम्हाला या भागाचा व्हिडिओ 29 एप्रिल 2024 रोजी पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब अकाऊंटवरून लाइव्ह केलेल्या व्हिडिओमध्ये देखील सापडला. सुमारे 39 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हा भाग पाहता आणि ऐकता येतो. याशिवाय, व्हायरल क्लिपच्या भागात आम्हाला गर्दीचे दृश्य देखील पाहायला मिळाले, ज्यामध्ये लोक दूरवर बसलेले दिसत होते.

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा आहे

संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केल्यावर, आम्हाला 29 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेले ट्विट आढळले. या ट्विटमधील व्हिडिओ व्हायरल झालेल्या व्हिडीओतील दृश्यांसारखाच आहे. पुण्यात झालेल्या पीएम मोदींच्या सभेत बहुतांश खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा रोहित पवार यांनी कॅप्शनमध्ये केला होता.

मात्र, रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये असलेल्या ऑडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाचाही समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदी असे म्हणताना दिसले की, “संत समाज सुधारक देश को दिए हैं और आज ये धरती, दुनिया को शानदार इनोवेटर्स दे रही है, टेक एंटरप्रेन्योर दे रही है”.

पंतप्रधान मोदींनी बोललेली ही वाक्ये आम्ही शोधली तेव्हा लक्षात आले की, पुण्यातील या सभेत पंतप्रधानांनी या गोष्टी सांगितल्या होत्या. पीएम मोदी म्हणाले होते की, “साथियों, इस धरती ने महात्मा फुले, साबित्री बाई फुले जैसे अनेक संत समाज सुधारक देश को दिए हैं. और आज ये धरती, दुनिया को शानदार इनोवेटर्स दे रही है, टेक एंटरप्रेन्योर दे रही है. पुणे जितना प्राचीन है, उतना ही फ्यूचरिस्टिक है”.

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची तुलना पुण्यातील रॅलीच्या व्हिडीओशी केली असता आम्हाला अनेक साम्य आढळले, जे तुम्ही खालील चित्रातून समजू शकता.

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा आहे

आम्ही पंतप्रधान मोदींच्या अंबाला आणि सोनीपतच्या सभांचे व्हिडिओही पाहिले. दरम्यान, दोन्ही रॅलींमध्ये भाषण करताना पंतप्रधान मोदींनी कोणत्याही प्रकारची पगडी घातली नाही, तर पुण्याच्या सभेत त्यांनी स्थानिक पारंपरिक पगडी घातल्याचे आम्हाला आढळले.

Conclusion

आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ हरियाणाचा नसून पुण्यातील पीएम मोदींच्या रॅलीचा आहे. मात्र, व्हायरल झालेला व्हिडीओ पुण्यातील मेळाव्यादरम्यान किंवा नंतर काढण्यात आला होता हे कळू शकले नाही.

Result: False

Our Sources
PM Modi Pune rally speech on narendramodi.in
Video streamed by Narendra Modi youtube account on 29th April 2024
Video tweet by NCP MLA Rohit Pawar on 29th April 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular