Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckFact Check: निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नवनीत राणा यांना अश्रू अनावर? नाही, 2022...

Fact Check: निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नवनीत राणा यांना अश्रू अनावर? नाही, 2022 चा व्हिडिओ अलीकडील म्हणून व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रडताना नवनीत राणा (संग्रहण लिंक).

Fact Check: निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नवनीत राणा यांना अश्रू अनावर? नाही, 2022 चा व्हिडिओ अलीकडील म्हणून व्हायरल

असाच आणखी एक दावा इथे पाहता येईल.

Fact

व्हायरल क्लिपमधून कीफ्रेमच्या रिव्हर्स इमेज शोधामुळे आम्हाला 5 मे 2022 रोजी इंडिया टुडेच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पोस्ट केलेल्या त्याच व्हिडिओकडे नेले.

वृत्तानुसार, अमरावतीच्या तत्कालीन खासदार, पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात पाहून बांध आवरू शकल्या नाहीत. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची धमकी दिल्याबद्दल या जोडप्यास अटक करण्यात आली होती आणि 12 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्यांचे भावनिक पुनर्मिलन होताना दिसले.

CNN-News18, ABP Live आणि Zee 24 Taas सारख्या इतर वृत्तवाहिन्यांनी देखील हाच व्हिडिओ आणि तत्सम माहिती प्रकाशित केली आहे.

त्यामुळे भाजपच्या नवनीत राणा यांचा भावनिक व्हिडिओ अलीकडचा नसून 2022 चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Source
Video by India Today, dated May 5, 2022
Video by CNN-News18,dated May 5, 2022
Video by ABP Livedated May 5, 2022
Video by Zee 24 Taasdated May 5, 2022

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular