Authors
Claim
आसाममध्ये काजल नावाच्या मुलीवर तिच्या मुस्लिम प्रियकराने बलात्कार करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह फ्रीझमध्ये बांधून ठेवला होता.
Fact
व्हायरल फोटोसह करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.
आसाममध्ये बलात्कार आणि लव्ह जिहादच्या दाव्यासह सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याचे दृश्य आहे. लव्ह जिहादच्या दाव्यासह हे छायाचित्र शेअर केले जात असून आसाममध्ये काजल नावाच्या मुलीवर शम्मी नावाच्या मुस्लिम व्यक्तीने ७ जणांसह बलात्कार केला आणि फ्रीझमध्ये पॅक केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे.
व्हायरल झालेल्या चित्रात अस्वस्थ करणारी दृश्ये आहेत. व्हायरल दावा कॅप्शनसह शेअर केला आहे, “आसाममध्ये आणखी एका श्रद्धाची हत्या. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या काजलवर आधी ७ मुस्लिम मुलांनी बलात्कार केला आणि नंतर जिवंत असतानाच बेशुद्ध केले. फ्रीज पॅक स्थितीत. त्यामुळे थंडीमुळे तिचा मृत्यू झाला, क्रूरतेची परिसीमा ओलांडली गेली तेव्हा गफ्फार मियाँ आणि त्याचे साथीदार आठ दिवसांपासून दररोज मुलीचा मृतदेह फ्रीजरमधून बाहेर काढायचे आणि मृत महिलेवर बलात्कार करायचे. नंतर ते पुन्हा फ्रीजरमध्ये पॅक करायचे.”
Fact Check/ Verification
Newschecker ने प्रथम चित्र तपासण्यासाठी रिव्हर्स इमेज शोध घेतला. यादरम्यान, आम्हाला २०१० मध्ये डॉक्युमेंटिंग रिॲलिटी नावाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या लेखात व्हायरल चित्र आढळले. व्हायरल चित्राशी संबंधित इतर अनेक चित्रे देखील या लेखात आहेत.
लेखात दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या ग्रेटर साओ पाउलो भागातील एका ४५ वर्षीय व्यक्तीला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीने तिचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेऊन लपवला होता. पत्नीने विष घालून मारण्याची धमकी दिल्याने या व्यक्तीने स्वसंरक्षणार्थ हे पाऊल उचलल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. मात्र, लेखात पीडितेचे किंवा आरोपीचे नाव नाही.
या वेळी, आम्हाला पोर्तुगीज वेबसाइटवर २०१० मध्ये प्रकाशित झालेला एक लेख देखील सापडला. या लेखात व्हायरल चित्र आहे. या लेखातही व्हायरल झालेले चित्र ब्राझीलच्या ग्रेटर साओ पाउलो भागातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, पुराव्याअभावी या फोटोबाबत पीडिता व आरोपीची माहिती अशी ठोस माहिती मिळू शकली नाही. पण हे चित्र २०१० पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय, आम्हाला असेही आढळले की २०२२ साली दिल्लीत २७ वर्षीय महिला श्रद्धा वालकरची हत्या झाल्यानंतरही हा फोटो आसामचा असल्याचे सांगून शेअर करण्यात आला होता.
खरं तर, मे २०२२ मध्ये, पालघर, महाराष्ट्रातील रहिवासी २७ वर्षीय श्रद्धा वालकरची दिल्लीत तिचा लिव्ह-इन रिलेशनशिप पार्टनर आफताब पूनावाला याने हत्या केली होती. हत्येनंतर आफताबने तिचे ३५ तुकडे करून जंगलातील विविध भागात फेकून दिले. आफताब पूनावाला सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. ट्रायल कोर्टाने पूनावाला यांच्यावर श्रद्धाची हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत.
२०२२ मध्येच, हे छायाचित्र आसाममधील असल्याचा दावा करून व्हायरल झाल्यानंतर, आसाम पोलिसांनी ८ डिसेंबर २०२२ रोजी ते खोटे असल्याचे ट्विट केले होते आणि म्हटले होते की “वर्ष २९१० च्या एका पोर्तुगीज ब्लॉगमध्ये असलेले चित्र आहे. खोटा दावा करून सोशल मीडियावर पसरवले जात आहे.”
Conclusion
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल चित्रासोबत केलेला दावा खोटा आहे. हे चित्र २०१० पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
Result: False
Our Sources
Article by Documenting Reality website on 8th Feb 2010
Article by Portuguese website on 4th March 2010
Tweet by Assam police on 8th Dec 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा