Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact CheckWeekly Wrap :राज ठाकरेंचे कंगनाला समर्थन ते संजय राऊत यांचा डांस, या...

Weekly Wrap :राज ठाकरेंचे कंगनाला समर्थन ते संजय राऊत यांचा डांस, या आहेत टाॅप फेक न्यूज

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. कंगणा रानौत विरुद्ध शिवसेना या प्रकरणात राज ठाकरे यांनी देखील उडी घेऊन कंगणाचे समर्थन केल्याचा दावा व्हायरल झाला तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत लग्नाच्या वरातीत नाचत होते याशिवाय इतरही दावे या आठवड्याता मोठया प्रमाणात व्हायरल झाले. हे सगळे दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता :

राज ठाकरे यांनी कंगणा रानौतचे समर्थन केल्याचा दावा व्हायरल

राज ठाकरे यांनी कंगणा रानौतचे समर्थन केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. राज यांनी कंगणाला मुंबईत येण्यापासून कोण रोखतंय असा इशारा दिल्याचे ट्विट व्हायरल झाले आहे. पडताळणीत राज ठाकरे यांच्या नावाने फेक ट्विटर अकाउंट उघडण्यात आले असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

लिंबाचा रस नाकात सोडला तर कोरोना नष्ट होत असल्याचा दावा

लिंबाचा रस नाकात सोडला तर कोरोना नष्ट होऊ शकतो असा दावा आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने केला असल्याची बातमी व्हायरल झाली. मात्र पडताळणी मध्ये हा दावा अशास्त्रीय असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

अमित शहा आणि येडियुरप्पा यांनी कोरोना लसी संदर्भात नागा साधूंची भेट घेतली?

देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटक चे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे कोरोना लसी संदर्भात नागा साधूंची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे. पडताळणी केली असता फोटो मोर्फ करून खोटी माहिती व्हायरल केल्याचं सत्य समोर आले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

उद्धव ठाकरे यांनी कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई आधी हिटलरचे दर्शन घेतल्याचा दावा

अभिनेत्री कंगणा रानौतच्या कार्यालयावर बीएमसी ने कारवाई करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिटलरच्या फोटोचे दर्शन घेतल्याचा एक फोटो व्हायरल झाला. पडताळणीत उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये पिता बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिल्याचा फोटो एडिट करुन चुकीच्या दाव्याने व्हायरल करण्यात आल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

संजय राऊत वरातीत नाचत असल्याचा दावा व्हायरल

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत लग्नाच्या वरातीत नाचत होते असा दावा सोशल मीडिया मध्ये शेअर होत आहे. यात एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात संजय राऊत यांच्या सारखे दिसणारे परभणीतील पोलिस कर्मचारी आहेत त्यांनी सेलू येथील लग्नात डांस केला होता. त्याचे शूट एका मुलाने आपल्या मोबाईलमध्ये केले आणि सोशल मीडियात व्हायरल केले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular