Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा...

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे असे सांगणाऱ्या मराठी बातमीचा स्क्रिनशॉट.
Fact

हा दावा दिशाभूल करणारा आहे. अशाप्रकारची बातमी कोणत्याही मराठी माध्यमाने प्रसिद्ध केलेली नसून व्हायरल इमेज हे मूळ गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन आहे.

सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे. असे सांगणारा दावा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे.

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल

“सुरतमध्ये गणपतीदादाला मोदींचा नोकर दाखवण्यात आल्याने वाद अंध भक्तांनी गणपतीजींना मोदींभोवती रांगेत उभे केले सुरत. अंध भक्तांची भक्ती मला सोडून गेली आहे. भाजप सरकार आणि मोदींचे धर्मांध आता मोदींना देवापेक्षाही वरचे मानत आहेत. हिंदुत्वाचादावा करणारा भाजप आता हिंदुत्वाचाच अपमान करण्यावर उतरला आहे. सुरतमधील भाजप नेत्यांनी गणपतीदादाला मोदींचे सेवक म्हणून दाखवले आहे. गणपती पंडालचा हा फोटो व्हायरल होत असून त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. गणपती दादा मोदींच्या आजूबाजूला सेवकासारखे उभे आहेत आणि मोदी डोळे मिटूनध्यानस्थ बसले आहेत, असे या फोटोत दिसत आहे. साधारणपणे छोट्या छोट्या गोष्टींवरून या भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. आणि सोशल मीडियावर रस्त्यावर उतरून निषेधकरण्यापासून ते असे करणाऱ्यांना जीवे मारण्याची किंवा बलात्कार करण्याची धमकी देण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. पण या बाबतीत भक्त निर्लज्ज होऊन गणपतीदादा बाजूला ठेवून सार्वजनिक ठिकाणी मोदींची पूजा करत आहेत. सुरतच्या गणपती पंडालमध्ये गणपती दादा असाच विनोद केला जायचा सर्वसामान्य जनता संतापली आहे. व असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून ही मूर्ती त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. विनाश काले विपरत बुध्दी” असे या दाव्यातील मजकूर सांगतो.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्यातील मराठी मजकुरात व्याकरणाच्या असंख्य चुका असल्याचे आमच्या निदर्शनास आले. मराठी ‘गणपती बाप्पा’ असे लिहिले जाते. मात्र या स्क्रीनशॉटच्या शीर्षकातच ‘गणपतीदादाला’ असा उल्लेख आल्याने अशाप्रकारे असंख्य चुका असलेला मजकूर एकाद्या माध्यमाने बातमी स्वरूपात छापला असण्याबद्दल आम्हाला संशय आला. मात्र खात्री करून घेण्यासाठी संबंधित किवर्डच्या माध्यमातून आम्ही शोध घेतला असता कोणत्याच मराठी माध्यमाने अशी बातमी छापलेली नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल

सुरत हे शहर गुजरात राज्यात येत असल्याने आम्ही आमच्या गुजराती टीमच्या माध्यमातून गुजराती भाषेतून कीवर्ड सर्च करून पाहिला असता, आम्हाला गुजराती माध्यमांनीही अशाप्रकारची बातमी प्रसिद्ध केल्याचा कोणताच पुरावा सापडला नाही. दरम्यान शोध घेताना आम्हाला फेसबुकवर Kuldeepsinh Mori नामक युजरने यासंदर्भात केलेली 3 सप्टेंबर 2022 रोजीची एक पोस्ट सापडली.

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल
Courtesy: FB/ Kuldeepsinh Mori

आम्हाला या पोस्टमध्ये व्हायरल मराठी दाव्यामध्ये वापरण्यात आलेल्या इमेजसह गुजराती मजकूर असलेला स्क्रिनशॉट आढळला. पोस्टसंदर्भात युजरने गुजराती भाषेत लिहिले असल्याने आम्ही त्याचे मराठीत भाषांतर केले. यावरून हे आढळले की, गुजराती बातमी असा आभास निर्माण करून 2022 मध्ये व्हायरल झालेल्या पोस्टचा संबंधित युजरने समाचार घेतला आहे.

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल
Courtesy: FB/ Kuldeepsinh Mori

संबंधित गुजराती पोस्टच्या कॅप्शनचे भाषांतर पुढीलप्रमाणे आहे. “वर्तमानपत्रासारखे दिसणारे हे कटिंग बोर्ड आजकाल फिरत आहेत, ज्यात वृत्तपत्राचे नाव नाही, लेखकाचे नाव नाही आणि जर हे सुरतमध्ये घडले असेल तर मला याशिवाय दुसरा फोटो दाखवा, तर आम्ही ते खरे मानू. फोटो एडीट करून वैचारिक जखमा कशा करायच्या हे जाणणाऱ्या एका वर्गाकडून अशा प्रकारची सामग्री तयार आणि प्रसारित केली जाते आणि अशा बौद्धिक फसवणुकीचे बळी हिंदू होतात. हे सत्य सिद्ध करण्यासाठी इतर कोणतेही फोटो आणि पुरावे असतील तर मला आनंद होईल!! टीप: ज्यांनी हा फोटो संपादित केला आहे त्यांनी खबरदारी घ्यायला हवी होती की वृत्तपत्रात तुम्ही वापरलेली भाषा कधीही वापरत नाही, जसे की “भाजपियाओ”. असे संपादन करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी जेणेकरुन इतरांनी हे करण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा…… पण तसे कोणी करत नाही.”

ही पोस्ट 2022 पासून गुजराती भाषेत व्हायरल करण्यात आली असल्याचे निदर्शनास आल्यावरून आम्ही मूळ गुजराती स्क्रिनशॉट गुगल लेन्सच्या भाषांतर या मेनूमध्ये घालून पाहिला. तेथे व्हायरल मराठी स्क्रीनशॉटमध्ये दिसणारी हेडलाइन आणि मजकूर भाषांतरित असल्याचे आणि सारखाच असल्याचे आढळले.

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल

अधिक तपासासाठी आम्ही गुजराती भाषेतील स्क्रिनशॉट दुसऱ्या तत्सम टूलवर चालवला, ज्याने पुढे पुष्टी केली की व्हायरल स्क्रीनशॉट मराठीत अनुवादित केलेल्या गुजराती लेखाचा आहे.

फॅक्ट चेक: गुजराती स्क्रीनशॉटचे डिजिटल ट्रान्सलेशन करून सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविल्याचा दावा व्हायरल

आम्हाला मूळ गुजराती बातमीचा स्रोत सापडू शकलेला नाही. दरम्यान संबंधित व्हायरल स्क्रिनशॉट हा डिजिटली अनुवादित असल्याची आणि हा प्रकार 2 वर्षांपूर्वीपासूनच गुजराती भाषेत इंटरनेटवर उपस्थित असल्याची पुष्टी आम्हाला मिळाली.

Conclusion

सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे असे सांगणाऱ्या मराठी बातमीचा स्क्रिनशॉट हा मूळ गुजराती स्क्रीनशॉटचा डिजिटल अनुवाद असल्याचे आणि दिशाभूल करीत व्हायरल झाल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Google Search
Facebook post, September 3, 2022
Image Analysis

(Inputs by Dipalkumar Shah)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular