Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

HomeFact Checkजोरदार गोळीबाराचा तो व्हिडिओ रशिया-युक्रेन युद्धातील आहे का? जाणून घ्या सत्य काय...

जोरदार गोळीबाराचा तो व्हिडिओ रशिया-युक्रेन युद्धातील आहे का? जाणून घ्या सत्य काय आहे

शेअरचॅटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो व्हिडिओ रशिया-युक्रेन युद्धातील आहे. व्हिडिओत जंगलाचे दृश्य दिसत आहे. त्यात जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे, त्याचबरोबर तिथे दोन माणसे माणसे चालतांना दिसतायेत. 

रशिया-युक्रेन व्हायरल व्हिडिओ
शेअरचॅटचा स्क्रिनशॉट – सचिन ओंकार

रशिया-युक्रेन व्हायरल व्हिडिओ
शेअरचॅटचा स्क्रिनशॉट – somanath Gadade

Fact Check / Verification 

या व्हिडिओचा शोध घेण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील एका की-फ्रेमला गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला एक व्हिडिओ मिळाला. Fedor Sivy या युजरने यु ट्यूबवर हा व्हिडिओ २१ डिसेंबर २०१८ रोजी अपलोड केला आहे. त्याखाली त्यांनी फक्त ‘videoplayback 4’ असं शीर्षक लिहिलंय.

यु ट्यूब व्हिडिओचा स्क्रिनशॉट – Fedor Sivy

या व्हिडिओचा शोध घेत असतांना अजून एक व्हिडिओ समोर आला. wildhunt espada या युजरने यु ट्यूबवर हा व्हिडिओ १४ जानेवारी २०१९ रोजी अपलोड केला होता. त्याखाली त्यांनी ‘Interesting view of Grad barrage’ असं शीर्षक लिहिलंय. पण नेमका हा मूळ व्हायरल व्हिडिओ कुठला आणि कशाचा आहे, हे आम्हांला समजू शकलेले नाही. 

रशिया-युक्रेन
यु ट्यूब व्हिडिओचा स्क्रिनशॉट – wildhunt espada

Conclusion 

अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, जोरदार गोळीबाराचा तो व्हायरल व्हिडिओ रशिया-युक्रेन युद्धातील नाही. जर आम्हांला या व्हिडिओशी संबंधित आणखी काही माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू.

Result : False Context / False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular