Saturday, October 5, 2024
Saturday, October 5, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: कर्नाटकातील लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे चित्र...

फॅक्ट चेक: कर्नाटकातील लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे चित्र म्हणून तेलंगणातील 2019 चा फोटो होतोय शेअर

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
कर्नाटकातील लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे चित्र.

Fact
पोस्टमध्ये शेअर केलेला फोटो CMR तेलंगणा ग्रुपने 2019 मधील त्यांच्या रमझान मोहिमेचा एक भाग म्हणून लावलेला जुना होर्डिंग आहे. CMR तेलंगणा ग्रुपने माफी मागितली आणि 2019 मध्ये विविध गटांकडून झालेल्या निषेधानंतर त्यांचे सर्व होर्डिंग काढून टाकले. पोस्टमध्ये शेअर केलेला फोटो जुना आहे आणि कर्नाटकचा नाही. त्यामुळे हा दावा खोटा आहे.

कर्नाटकातील CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे ‘लव्ह जिहाद’ चे समर्थन करणारे चित्र असे सांगत एक दावा व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: कर्नाटकातील CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे ‘लव्ह जिहाद’ चे समर्थन करणारे चित्र म्हणून तेलंगणातील 2019 चा फोटो होतोय शेअर
Courtesy: X@adwait_anant

“बघा नीट आणि उघडा डोळे… या मागे कोणता उद्देश असेल जाणून घ्या… मुसलमानांना आव्हान करत आहे हा मॉल की तुम्ही हिंदू मुलीसोबत खरिदारी करायला याल तर 10 ते 50 टक्के सूट मिळेल.. कशासाठी पाहिजेत यांना हिंदू मुली ? मुसलमान मुली संपल्या का या जेहाद्याना. फक्त हिंदू मुलींना घेऊन या असे पोस्टर कर्नाटक राज्यात लागतात जिथे कांग्रेस सरकार आहे.. याला सरकारचा वरदहस्त नक्की आहे…” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे.

दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: कर्नाटकातील CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे ‘लव्ह जिहाद’ चे समर्थन करणारे चित्र म्हणून तेलंगणातील 2019 चा फोटो होतोय शेअर

Fact Check/ Verification

पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोच्या रिव्हर्स इमेज सर्चवर, तोच फोटो 2019 मध्ये अनेक न्यूज पेजेस आणि फेसबुक युजर्सनी शेअर केल्याचे आम्हाला दिसून आले.

Pragathi News ने 3 जून 2019 रोजी, ATK News ने 3 जून 2019 आणि 31 मे 2019 रोजी Santosh Godse नामक युजरने हाच फोटो पोस्ट केलेला आढळला.

या सर्व न्यूज साईट्स आणि युजर्सनी दिलेल्या माहितीत हैदराबादमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे तेलंगणा विधानसभेचे भाजप सदस्य राजा सिंह यांनी रमजान मोहिमेचा एक भाग म्हणून लावलेल्या वादग्रस्त बॅनरवरून CMR शॉपिंग मॉलचा निषेध केला होता.

तेलंगणाचा उल्लेख आल्याने आम्ही व्हायरल फोटोचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर, होर्डिंगच्या तळाशी, तेलंगणातील CMR शॉपिंग मॉल्सच्या विविध शाखांची नावे दिसली. भाषांतरित केल्यावर बॅनरमध्ये सिकंदराबादमधील मंजू थिएटरजवळील पटनी सेंटर, मलकाजगिरी, सिद्धीपेट आणि महबूबनगर येथे असलेल्या सीएमआर शाखांचा विशेष उल्लेख आहे. यावरून सदर जाहिरात कर्नाटकातील नसून तेलंगणा येथील असल्याचे स्पष्ट होते.

फॅक्ट चेक: कर्नाटकातील CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे ‘लव्ह जिहाद’ चे समर्थन करणारे चित्र म्हणून तेलंगणातील 2019 चा फोटो होतोय शेअर

जेव्हा आम्ही संबंधित कीवर्ड वापरून पुढील तपासासाठी शोध घेतला तेव्हा आम्हाला 31 मे 2019 रोजी CMR शॉपिंग मॉलने जारी केलेला माफीनामा सापडला. CMR शॉपिंग मॉलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “संपूर्ण CMR तेलंगणा समूहाकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा कोणताही भेद निर्माण करण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व धर्मांचे समर्थन करतो आणि पक्षपात न करता प्रत्येक समुदायाचा आदर करतो. सर्व होर्डिंग्ज काढण्यात आली असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी देतो. सीएमआर शॉपिंग मॉल आंध्र प्रदेश याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही.”

फॅक्ट चेक: कर्नाटकातील CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे ‘लव्ह जिहाद’ चे समर्थन करणारे चित्र म्हणून तेलंगणातील 2019 चा फोटो होतोय शेअर

विशेष म्हणजे या बॅनरवरून आंध्रप्रदेश येथेही मोठे वादळ निर्माण झाले होते, त्यावेळी सीएमआर शॉपिंग मॉल आंध्र प्रदेशनेही ही जाहिरात त्यांच्याकडून जारी करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण 31 मे 2019 रोजी जारी केले होते. या सर्व पुराव्यांवरून असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की पोस्टमध्ये शेअर केलेला फोटो जुना असून कर्नाटकचा नाही.

फॅक्ट चेक: कर्नाटकातील CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे ‘लव्ह जिहाद’ चे समर्थन करणारे चित्र म्हणून तेलंगणातील 2019 चा फोटो होतोय शेअर

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात हे स्पष्ट झाले की, व्हायरल पोस्टमध्ये शेअर केलेला फोटो CMR तेलंगणा ग्रुपने 2019 मधील त्यांच्या रमझान मोहिमेचा एक भाग म्हणून लावलेला जुना होर्डिंग आहे. CMR तेलंगणा ग्रुपने याबद्दल माफी मागितली आणि 2019 मध्ये विविध गटांकडून झालेल्या निषेधानंतर त्यांचे सर्व होर्डिंग काढून टाकले. पोस्टमध्ये शेअर केलेला फोटो जुना आहे आणि कर्नाटकचा नाही. त्यामुळे हा दावा खोटा आहे.

Result: False

Our Sources
Post published by Pragathi News on June 3, 2019
Post published by ATK News on June 3, 2019
Apology by CMR Shopping Mall on May 31, 2019
Clarification by CMR Shopping Mall on May 31, 2019


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular