Tuesday, June 25, 2024
Tuesday, June 25, 2024

HomeFact Checkश्रीनगरमध्ये दहशतवादी पकडल्याचा नाही व्हायरल व्हिडिओ,जाणून घ्या सत्य

श्रीनगरमध्ये दहशतवादी पकडल्याचा नाही व्हायरल व्हिडिओ,जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एका मोटारसायकलस्वाराला पोलिस मोठ्या शिताफिने पकडत असल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या आधी एक दिवश जम्मू कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्याला पकडल्याचा हा व्हिडिओ आहे.

आमच्या एका वाचकाने 9999499044 या व्हाट्सअॅप हेल्पलाईनवर हा व्हिडिओ शेअर करुन या सदंर्भात पडताळणी करण्याची विनंती केली होती. हा व्हिडिओ याच दाव्याने फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

युट्यूबवर देखील याच दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Fact Check/Verification

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीचा म्हणून शेअर केलेल्या या व्हिडिओ बद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रथम व्हिडिओला कीफ्रेममध्ये विभागले आणि नंतर रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडिओ भारताताील नाही तर दुसर-या देशातील असल्याचे आढळून आले.

उपरोक्त मिळालेल्या Ricmais च्या रिपोर्टनुसार,व्व्हिहायरलडिओ ब्राझीलच्या उमुरामा येथील पेरोलाचा आहे, जिथे स्थानिक पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा दुचाकीस्वार थांबला नाही, तेव्हा पोलिसांनी त्याला फिल्मी स्टाईलने पकडले Ricmais च्या अहवालानुसार, आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेकांनी संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. या रिपोर्टमधील उता-यानुसार, ( इंग्रजीमध्ये अनुवादित) “A motorcyclist tried to escape an approach by the Military Police (PM) in Pérola, region of Umuarama (PR), but was surprised by a blow worthy of a martial arts film , given by a police officer, on Sunday night (01). The 17-year-old boy was apprehended . The scene was filmed by people who were on the street. The situation happened on Pearl Avenue Byington , in the center of the city, close to 19:40 . According to the PM, the police were carrying out patrols when they decided to approach a motorcyclist in a suspicious attitude. The reporter contacted the Military Police, who responded in a statement that the teenager “was referred to the city’s Military Police Detachment for appropriate procedures, accompanied by his father and the Guardianship Council. According to the police report, medical care was provided to the teenager, but he refused. The command of the 25th Battalion set up an internal investigation to investigate the facts that had occurred.

त्यानंतर आम्ही वरील रिपोर्टमध्ये शेअर केलेल्या माहितीच्या आधारे यूट्यूबवर ‘MOTOCICLISTA POLICIAL Polícia Militar Perola’ या कीवर्डने शोध घेतला, जिथे आम्हाला व्हायरल व्हिडिओसारखेच इतर अनेक व्हिडिओ देखील सापडले. जवळजवळ सर्वांनी हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचे सांगितले आहे.

हा व्हिडिओ अनेक व्हेरिफाईड YouTube चॅनेलद्वारे जवळजवळ सारख्या वर्णनासह शेअर केला गेला आहे.

याशिवाय एक ट्विट देखील आढळून आले ज्यात हा व्हिडिओ ब्राझीलमधील असल्याचे म्हटले आहे.

Conclusion

आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ श्रीनगरमध्ये आतंकवादी पकडल्याचा नाही तर ब्राझीलमध्ये एका मोटारसाईकलस्वाराला पोलिसांनी पकडल्याचा आहे.

Result: Misleading

Our Sources

Ricmais

ND Mais


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular