Saturday, November 16, 2024
Saturday, November 16, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: सदा सरवणकर म्हणाले की, त्यांना उद्धव ठाकरे आठवतात? येथे जाणून...

फॅक्ट चेक: सदा सरवणकर म्हणाले की, त्यांना उद्धव ठाकरे आठवतात? येथे जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
जेव्हा माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येतो तेव्हा मला उद्धव ठाकरे आठवतात, असे सदा सरवणकर म्हणाले.
Fact

हा दावा लोकसत्ताचे एडिटेड न्यूजकार्ड बनवून करण्यात आला असून खोटा आहे.

माहीमच्या जागेवर महायुतीने मनसेला पाठींबा द्यावा ही मागणी आणि महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना दिलेली उमेदवारी यावरून सध्या पेच सुरु आहे. याच परिस्थितीत मूळ शिवसेनेतुन फुटून आलेले सदा सरवणकर यांच्या नावाने एक दावा व्हायरल झाला आहे. आज जेंव्हा माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येतो तेंव्हा मला उद्धव ठाकरे आठवतात, असे विधान सरवणकर यांनी केल्याचे हा दावा सांगतो.

फॅक्ट चेक: सदा सरवणकर म्हणाले की, त्यांना उद्धव ठाकरे आठवतात? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: FB/ डॉ रेणुका गजानन पतंगे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख हिंगोली

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: सदा सरवणकर म्हणाले की, त्यांना उद्धव ठाकरे आठवतात? येथे जाणून घ्या सत्य

युजर्सनी “आज जेव्हा माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येतो तेव्हा मला उद्धव ठाकरे आठवतात. त्यांची साथ सोडली त्याचे परिणाम मी आज भोगतोय. सत्ता असेल नसेल पण उद्धवजी ठाकरें सारखा माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही.” असे लिहिलेले लोकसत्ताचा लोगो असणारे न्यूजकार्ड शेयर केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check/ Verification

आम्ही सदा सरवणकर यांचे हे विधान किंवा बातमी लोकसत्ता या माध्यमाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया अकौंट्सवर दिली आहे का? याचा शोध घेतला. मात्र आम्हाला तसे काहीच आढळले नाही.

शोध घेत असताना आम्हाला लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर ३ नोव्हेंबर २०२४ रोजी केलेली एक पोस्ट आणि त्यामधील न्यूजकार्ड आढळले. “माहीम विधानसभेतील प्रत्येक गल्लीत, घरात माझ्या कामामुळे माझी ओळख निर्माण झाली आहे. – सदा सरवणकर” अशा कॅप्शनखाली हे न्यूजकार्ड असल्याचे आम्ही खाली पाहू शकतो.

सदर पोस्ट पाहिल्यानंतर आम्हाला व्हायरल न्यूजकार्ड आणि ओरिजनल न्यूजकार्डमध्ये सदा सरवणकर यांचा फोटो, त्यामधील पेहराव आदी गोष्टीत साम्य असून केवळ सदा सरवणकर यांच्या नावे लिहिलेली वाक्ये वेगळी आहेत. तुलनात्मक परीक्षण खाली पाहता येईल.

या परीक्षणानंतर आम्ही लोकसत्ताशी संपर्क साधला. आम्हाला Loksatta.com चे संपादक योगेश मेहेंदळे यांची यासंदर्भातील प्रतिक्रिया मिळाली. “लोकसत्ताने अशी कोणतीही बातमी केली नाही. तसेच व्हायरल न्यूजकार्ड बनावट आहे.” अशी माहिती मिळाली.

अधिक तपासात आम्हाला खुद्द सदा सरवणकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर या दाव्याचे खंडन करण्यासाठी केलेली ४ नोव्हेंबर २०२४ रोजी केलेली पोस्ट आढळली.

फॅक्ट चेक: सदा सरवणकर म्हणाले की, त्यांना उद्धव ठाकरे आठवतात? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: FB/ Sada Sarvankar

“आपली विकासकामे, ‘उबाठा’चे खोटे कारनामे…खोटे लोक, खोटंच पसरवणार… सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या एका क्रिएटिव्ह पोस्टमध्ये मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात लोकसत्ताचे नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. मी जनतेचे माझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल बोललो. पण ते खोडून उद्धव ठाकरे यांच्याविषयी विधान केल्याचा दावा या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या क्रिएटिव्हमध्ये करण्यात आला आहे. परंतु अशाप्रकारे कुठलीही प्रतिक्रिया मी दिलेली नाही. आणि लोकसत्ताने ही अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही. या खोडसाळपणाची तक्रार ‘सायबर क्राइम’ शाखेकडे करण्यात येणार आहे.” असे सदा सरवणकर यांनी या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

यावरून संबंधित दावा एडिटेड न्यूजकार्डच्या माध्यमातून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात लोकसत्ताचे न्यूजकार्ड एडिट करून सदा सरवणकर यांच्या नावे खोटा दावा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Altered Photo

Our Sources
Social Media accounts and Website of Loksatta
Facebook post made by Loksatta on November 3, 2024
Facebook post made by Sada Sarvankar on November 4, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular