Authors
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम संपली आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात अनेक फेक दावे व्हायरल झाले. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ईव्हीएमविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, असा दावा करण्यात आला. अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून आंदोलन झाले, असा दावा करण्यात आला. यूपीच्या संभळमध्ये पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला, असा दावा झाला. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कारसेवकाच्या भूमिकेत एकत्र दिसत आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आम्हाला या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झाली ईव्हीएमविरोधात जोरदार निदर्शने?
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ईव्हीएमविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून झाले हे आंदोलन?
अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून आंदोलन झाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
यूपीच्या संभळमध्ये पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला?
यूपीच्या संभळमध्ये पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
या फोटोत एकनाथ शिंदे नाहीत
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कारसेवकाच्या भूमिकेत एकत्र दिसत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा