Authors
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही सोशल मीडिया फेक पोस्टनी गाजला. महाकुंभ २०२५ पूर्वी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, असा दावा झाला. शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत गौरी खानने इस्लाम कबूल केल्याचा दावा करण्यात आला. तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला रुग्णवाहिका मिळाली नाही, त्याच्या कुटुंबाला मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले, असा दावा करण्यात आला. HMPV संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, असा दावा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर धाड पडल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला?
महाकुंभ २०२५ पूर्वी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
शाहरुख आणि गौरी खानचा फोटो सांगत AI-जनरेटेड
शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत गौरी खानने इस्लाम कबूल केल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.
हा व्हिडिओ तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीशी संबंधित नाही
तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला रुग्णवाहिका मिळाली नाही, त्याच्या कुटुंबाला मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
HMPV संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली?
HMPV संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले.
डान्सबारवर पडलेल्या छाप्याशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही
आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर धाड पडल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा