Sunday, June 16, 2024
Sunday, June 16, 2024

HomeFact Checkउलट क्रमाने एटीएम पिन टाकल्याने पोलिसांना सूचित केले जात नाही

उलट क्रमाने एटीएम पिन टाकल्याने पोलिसांना सूचित केले जात नाही

फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, गेल्या काही वर्षांपासून, बरेच युजर्स एक पोस्ट शेअर करत आहेत की एखाद्या व्यक्तीला एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी दरोडेखोरांनी भाग पाडले तर तो त्याचा एटीएम पिन उलट क्रमाने घालून पोलिसांना सूचित करू शकतो. ही पोस्ट व्हाट्सअप वर सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.

एटीएम केंद्रावर लुटले जात असताना उलटा पिन वापरल्यास तात्काळ पोलिसांना सूचित करता येते आणि तशी यंत्रणा एटीएम मशीन मध्ये बसविण्यात आली आहे
Courtesy: Whatsapp Viral Message

“ATM बद्दल…थोडसं…
तुम्हांला माहित आहे का? जर का तुमच्या एटीएम (ATM) कार्डासहीत, तुमचं कोणी अपहरण केलं, तर काही काळजी करू नका! तुम्ही त्यांना अजिबात विरोध करू नका, अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका. तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. फक्त तुम्ही अपहरणकर्ते सांगतील, त्याप्रमाणे पैसे काढण्याचे काम करा! पण तेव्हा, आपल्या ATMचा PIN उलटा टाईप करा. समजा, जर का आपला PIN १२३४ असेल तर त्या जागी ४३२१ असा टाईप करा. आणि मग त्यानंतर पाहा काय होतं ते. तुम्ही PIN क्रमांक उलटा टाईप केल्याने ATM मशीनला कळेल की, तुम्ही काही तरी अडचणीत आहात. त्यामुळे तुम्ही फारच अडचणीत आहात . आणि ते जाणवल्याने ATM
मशीन तुमच्या बँकेला आणि जवळच्या पोलीस स्टेशनलाही सुचना देईल, आणि त्याचबरोबर ATM चा बँकेचा दरवाजा देखील लगेचच बंद होईल. आणि अपहरणकर्त्याला काहीही न कळता तुम्ही सुरक्षितरित्या वाचू शकता. ATM मध्ये पहिल्यापासूनच सिक्युरिटीबाबत अशी सोय करण्यात आली आहे. याबाबत फारच थोड्या लोकांना माहिती आहे. तर तुम्ही अपहरणकर्त्याला सहजपणे पकडून देऊ शकता. प्रत्येकाने हि पोस्ट शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण ह्याबद्दल सांगा…From…MUMBAI POLICE, MAHARASHTRA POLICE” असे तो मेसेज सांगतो. हा मेसेज सध्या अनेकजण फॉरवर्ड करीत आहेत.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact check/ Verification

हा मेसेज बघितल्यानंतर हे आवाहन मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी केल्याचे मेसेजच्या शेवटी लिहिल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ आणि ट्विटर अकाउंट शोधले. मात्र आम्हाला या विषयात पोलीस दलाने केलेले कोणतेही अधिकृत प्रकटन किंवा असे आवाहन केले असल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्स सापडले नाहीत. त्यानंतर आम्ही “एटीएम सुरक्षा महाराष्ट्र पोलीस आवाहन” असे किवर्ड सर्च करून पाहिले पण काहीच हाती लागले नाही.

सायबर आणि गुन्हेगारी या विषयाशी या मेसेज चा संबंध असल्याने आम्ही महाराष्ट्र सायबर गुन्हेगारी विभागाशी संपर्क साधला. महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे महासंचालक संजय शिंत्रे यांना या बद्दल विचारले, “या मेसेजही आणि त्यातील आवाहनांशी पोलीस खात्याचा काहीच संबंध नसल्याचे” त्यांनी आम्हाला सांगितले. तसेच आणखी काही माहिती उपलब्ध करून दिली. “असे तंत्रज्ञान अस्तित्त्वात आहे परंतु व्यावहारिक गुंतागुंतीमुळे ते जगात कुठेही तैनात केलेले नाही. त्यामुळे, हा दावा खोटा आहे कारण दाव्यात असे सुरक्षा वैशिष्ट्य प्रत्येक एटीएम मध्ये बसविण्यात आल्याचे म्हटले आहे.” असे त्यांनी सांगितले.

कोणी लुटारू किंवा अपहरणकर्त्यांनी आपल्याला पैसे काढण्यासाठी जबरदस्ती केल्यास पिन क्रमांक उलटा घातल्यास लगेच पोलिसांना सूचित करण्याचे तंत्रज्ञान अस्तित्वात आहे का? याचा शोध आम्ही घेतला असता, आम्हाला Orlando Sentinel या संकेत स्थळावर याबद्दलची माहिती मिळाली. 1994 मध्ये जोसेफ झिंगर या अमेरिकन वकिलाने अशा पद्धतीच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. झिंगरने बँकेकडून पोलिसांना इमर्जन्सी कॉल म्हणून उलटा पिन देण्याची सूचना केली व तशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारीही दाखविली होती. मात्र बँकांचा निरुत्साह व इतर तांत्रिक कारणांमुळे याबद्दल पुढील कार्यवाही होऊ शकली नाही. ही व्यवस्था अस्तित्वात असली तरी ती कार्यरत झाली नाही. असे आमच्या निदर्शनास आले. nbcnews या संकेतस्थळावरही आम्हाला याबद्दल माहिती मिळाली.

एटीएम केंद्रावर लुटले जात असताना उलटा पिन वापरल्यास तात्काळ पोलिसांना सूचित करता येते आणि तशी यंत्रणा एटीएम मशीन मध्ये बसविण्यात आली आहे
Screengrab Of Orlando Sentinel

जोसेफ झिंगर या व्यक्तीने ही यंत्रणा तयार करून त्याचे पेटंटही मिळविल्याचे आमच्या लक्षात आले. मात्र ती यंत्रणा कार्यरत न झाल्याचे दुःख त्याने अनेक माध्यमांना मुलाखती देताना व्यक्त केले आहे.

एटीएम केंद्रावर लुटले जात असताना उलटा पिन वापरल्यास तात्काळ पोलिसांना सूचित करता येते आणि तशी यंत्रणा एटीएम मशीन मध्ये बसविण्यात आली आहे
Screengrab of google patent
एटीएम केंद्रांवर होणाऱ्या खून आणि लुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र या घटना घडण्यापूर्वी पोलिसांना सूचित करणारी यंत्रणा अस्तित्वात नसल्याचेही आमच्या निदर्शनास आले.

एटीएम केंद्रावर लुटले जात असताना उलटा पिन वापरल्यास तात्काळ पोलिसांना सूचित करता येते आणि तशी यंत्रणा एटीएम मशीन मध्ये बसविण्यात आली आहे
Screengrab of Google Search

Conclusion

एटीएम केंद्रावर लुटले जात असताना उलटा पिन वापरल्यास तात्काळ पोलिसांना सूचित करता येते आणि तशी यंत्रणा एटीएम मशीन मध्ये बसविण्यात आली आहे. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources

Conversation with DG Cyber Cell, Maharasthra Mr. Sanjay Shintre

Article Published by Orlando Sentinel

Article Published by nbcnews

Report of Google Petant


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular