Saturday, December 3, 2022
Saturday, December 3, 2022

घरCoronavirusतामिळनाडू सरकारने सिंगापूरवरुन येणा-यांसाठी नोटीस जारी केली नाही. वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

तामिळनाडू सरकारने सिंगापूरवरुन येणा-यांसाठी नोटीस जारी केली नाही. वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Claim–  तामिळनाडू सरकारने सिंगापुरवरुन येणा-ाया लोकांसाठी नोटीस जारी केली आहे,  आजाराचे कोणते लक्षण असो किंवा नसो 28 दिवसांसाठी त्यांना वेगळे ठेवले जाईल.
Verification– सोशल मीडियात सध्या कोरोना व्हायरस संदर्भात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. आमच्या एका वाचकाने अशीच एक व्हाट्सअॅप्प वर व्हायरल होत असलेली पोस्ट आम्हाला पडताळणीसाठी पाठवली. ही पोस्ट इंग्रजीमध्ये आहे.
Just received a notice from tamilnadu govt issued notice that people who travel from Singapore to India will be home isolated for 28 days and cannot return inspite of being asymptomatic or symptomatic.
अनुवाद- तामिळनाडू सरकारने सिगापूरवरून भारतात येणा-यासांठी नोटीस जारी केली आहे हे लोक 28 दिवसांपर्यत परतु शकत नाहीत, त्यांना कोणती आजाराची लक्षणे असो वा नसो 28 दिवसांपर्यंत त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवले जाणार आहे.
आम्ही या संदर्भात काही कीवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला याबाबत अनेक बातम्या दिसून आल्या.
आम्हाला deccanherald.com या वेबसाईटवर एक बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की चीनमधून तामिळनाडूत आलेल्या 242 लोकांना वेगळ्या ठिकाणी  हाॅस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.
याशिवाय टाईम्स आॅफ इंडियातील बातमी आढळली. यात म्हटले आहे की चीनवरुन परतलेल्या एक व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळल्याने त्याला विशेष वार्डात ठेवण्यात आले आहे.
मात्र या बातम्यांमध्ये कुठेही सिंगापुरवरुन येणा-या लोकांसाठी नोटीस जारी केल्याचे म्हटलेले नाही. आम्हाला तामिळनाडू आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर ही याबाबत सूचना आढळली नाही. विभागाने कोरोना व्हायरस वह एक बुलेटीन जारी केले आहे मात्र त्यातही फक्त सिंगापूरहून आलेल्या नव्हे तर चीनवरुन आलेल्या लोकांमध्ये  लक्षणे आढळली त्या लोकांच्या आरोग्यावर 28 दिवसांपर्यंत नजर ठेवण्यासंबंधी माहिती दिली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की सिंगापूरवरुन येणा-या लोकांसबंधी तामिळनाडू सरकारने विशेष नोटीस जारी केलेली नाही. सोशल मीडियामध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे.
Sources
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular