Thursday, September 19, 2024
Thursday, September 19, 2024

HomeFact Checkसुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिलेला नाही,...

सुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश दिला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या दाव्यानुसार India हे नाव आता कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवहारात वापरता येणार नाही. आता INDIAN नाही तर भारतीय असणार आहोत

व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

सर्व भारतीयांना शुभेच्छा …!!

“मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 15 जून 2021 पासून सगळीकडे आपल्या प्रिय भारतभूमीचे नाव “भारत” या नावानेच ओळखले जाईल. India हे नाव आता कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवहारात वापरता येणार नाही. खरोखर हा निर्णय ऐकुन मन भरून आले. आता प्रत्येक भारतीयाला स्वाभिमानाने सांगता येईल I am Bharitiya ज्यांनी भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून जीवाचे बलिदान केले आणि ज्या देशप्रेमींना इंग्रजांनी भारताचे नामांतरण करून ठेवलेले नाव India हे नको होते व या देशाची भारत म्हणूनच ओळख रहावी अशा देश प्रेमिंचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून हा आनंद त्यांना समर्पित. आता indian नाही तर फक्त आणि फक्त “भारत” गर्व करा भारतीय http://असल्याचा.भारत माता की जय ! भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत.”

आमच्या एका वाचकाने व्हाट्सअॅपवर व्हायरल होत असलेला मेसेज आमच्याकडे पडताळणीसाठी पाठविला आहे.

फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

Fact Check/Verification

सुप्रीम कोर्टाने 15 जून 2021 पासून India हे नाव आता कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवहारात वापरता येणार नाही, असा आदेश दिला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला या संदर्भात बातमी आढळून आली नाही मात्र आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला मागील वर्षी म्हणजेच 02 जून 2020 रोजीची महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, राज्यघटनेतीलल इंडिया हे नाव काढून टाकण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

बातमीनुसार, India, that is Bharat (भारत, अर्थात इंडिया), असे भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात देशाचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र, भारत हा देश एकच असताना, देशाला २ नावे कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत हे प्रकरण आता याचिकेच्या स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती. मात्र, ती टळली आहे. आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होत आहे. भारत हा शब्द गुलामगिरीचे लक्षण आहे, असा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आहे. आणि म्हणून त्याऐवजी भारत किंवा हिंदुस्थान या शब्दांचा वापर करावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

बातमीत पुढे म्हटले आहे की, इंग्रजी नाव हटवले जाणे, भलेही प्रतीकात्मक असेल, परंतु ते आमच्या राष्ट्रीयत्वाबद्दल, विशेषत: भविष्यातील पिढीसाठी अभिमानाचे लक्षण असेल, असे सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे. वास्तविक, इंडिया या शब्दाच्या जागी भारत असा बदल केल्यास स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पूर्वजांच्या केलेल्या संघर्षमय सहभागाशी ते न्यायसंगत होईल,असे याचिकेत म्हटले आहे.

या संदर्ता आम्ही शोध पुढे चालूच ठेवला असता आम्हाला 03 जून 2020 रोजीची तरुण भारतची बातमी आढळून आली. ज्यात ‘इंडिया’ नाव बदलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अशी माहिती देण्यात आल्याचे आढळून आले. यात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये नमूद असलेले देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून त्याजागी ‘हिंदुस्तान’ किंवा ‘भारत’ करण्यात यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने याचिकाकर्त्यांना धक्का बसला आहे. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी, त्यावर संबंधित मंत्रालय निर्णय घेईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

याशिवाय आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर या निर्णयाची प्रत देखील आढळून आली. मात्र केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्याची किंवा स्पष्टिकरण दिल्याची माहिती किंवा माहिती आढळून आलेली नाही. यावरुव स्पष्ट झाले की, सुप्रीम कोर्टाने 15 जून 2021 पासून देशाचे नाव फक्त भारत असण्याचा आदेश दिलेला नाही.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, सुप्रीम कोर्टाने India हे नाव आता कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवहारात वापरता येणार नाही, असा आदेश दिलेला. नाही उलट ही याचिका फेटाळून लावली आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही

Result: False

Claim Review:  सुप्रीम कोर्टाने 15 जूनपासून देशाचे नाव फक्त ‘भारत’ करण्याचा आदेश
Claimed By: Viral Post
Fact Check: False

Our Sources

महाराष्ट्र टाईम्स- https://maharashtratimes.com/india-news/indian-that-is-bharat-demand-of-changing-the-name-india-written-in-constitution-in-article-1-of-indian-constritution-made-by-a-petition/articleshow/76147762.cms

तरुण भारत- https://www.tarunbharat.net/Encyc/2020/6/3/supreme-court-disposes-off-petition-to-change-india-name.amp.html

सुप्रीम कोर्ट –https://main.sci.gov.in/supremecourt/2020/4436/4436_2020_31_2_22411_Order_03-Jun-2020.pdf


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular