Claim–
पहा कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एक महिला पोलिस अधिकारी एक मॅनेजरला कशा प्रकारे कंपनी बंद करायला लावतात.

दाव्याचे संक्षिप्त विवरण–
policewala Bhau नावाच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेयर करण्यात आला असून यात दावा करण्यात आला आहे गुलाबी रंगाचा शर्ट घातलेली महिला कंपनी बंद करण्याच आदेश असताना का ती बंद करुन वर्क फ्राॅम काम का सुरु करत नाहीत असा जाब विचारत आहे. ती महिला पोलिस अधिकारी असल्याचे व तिने कंपनी बंद करण्यास भाग पाडल्याचा दावा या व्हिडिओ पोस्टकर्त्याने केला आहे.
Verification–
आम्ही व्हिडिओमध्ये गुलाबी शर्ट घातलेली महिला नेमकी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवर देखील हाच व्हिडिओ याच दाव्याने अनेक यूजर्सनी शेयर केला आहे.

व्हिडिओ बारकाईने पाहिला असता महिला सुरवातीलाच म्हणते आहे की, माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्तीने येऊन सांगण्याची गरज नव्हती.
त्यामुळे एक महिला पोलिस अधिकारी स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता का म्हणेन हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे याबाबत शोध घेण्यास सुरवात केली असता यूटयूब वर Viral India नावाच्या चॅनलेवर हाच व्हिडिओ आढळला यात व्हिडिओच्या डिस्क्रीप्शनमध्ये म्हटले आहे की, पुण्याताली टेक महिंद्रा कंपनी चालू होती त्यावेळी मनसेच्या महिला नेता व सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनी पोलिस स्टाईल एंट्री करुन कंपनी बंद करायला लावली.
याशिवाय आरएनओ या चॅनलने ही विशाखा गायकवाड यांची याबाबत प्रतिक्रिया घेतली होती त्या बातमीचा व्हिडिओ देखील यूट्यूबवर आढळून आला. यात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जमावबंदीचा आदेश लागु केला असतानाही पुण्यातील काही खाजगी आणि आयटी कंपन्या शासनाचे आदेश पाळत नसल्याचं दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनी खाजगी कंपनीत गेल्यावर त्यांना नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळाली याचे पोलखोल करत फेसबूकवरुन त्यांना जाब विचारला.
याशिवाय विशाखा गायकवाड यांनी आपल्या फेसबुक पेज वर पोस्टमध्ये याबाबत सविस्तर लिहिले असून या प्रसंगाचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल पोस्ट आणि व्हिडिओमध्ये संबंधित महिला पोलिस अधिकारी असल्याचा करण्यात आलेला दावा हा खोटा असून व्हिडिओमधील महिला पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या विशाखा या गायकवाड या आहेत. सोशल मीडियात भ्रामक दावा व्हायरल होत आहे.
Source
Youtube
Facebook
Google keyword Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)