Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeCoronavirusअबू आझमी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली गेली नाही, भ्रामक दावा...

अबू आझमी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली गेली नाही, भ्रामक दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा- समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांच्यासमोर वडाळा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. 

सोशल मीडियात वडाळा रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात स्टेशनवर एक ट्रेन उभी असून याचवेळी सपा नेते आमदार अबू आझमी प्लॅटफाॅर्मवरुन आपल्या कार्यकर्त्यांसह जाताना दिसत आहे. यादरम्यान एका व्यक्तीचा घोषणा देण्याचा आवाज व्हिडिओमध्ये एेकू येतो. यात ती व्यक्ती अबू आजमी जिंदाबाद, मुंबई पोलिस जिंदाबाद यासोबतच पाकिस्तानच जिंदाबादची घोषणा दिल्याचे एेकू येते.
पडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. काही किवर्ड्सचा वापर करुन गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला याच दाव्याचे एक ट्विट आढळून आले.

https://twitter.com/Saaho_sher/status/1261886085778399232

अर्काईव्ह

याशिवाय याच दाव्याचॆ अनेक ट्विट्स आढळून आले.

 या संदर्भात अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही किवर्ड्सचा वापर केला असता 14 मे रोजीची एक फेसबुक पोस्ट आढळून आली ज्यात वडाळा रेल्वे स्टेशनवर अबू आझमी रेल्वेतील प्रवाशांना सूचना देताना दिसत आहेत. यात म्हटले आहे की वडाळा येथून उत्तर प्रदेशातील बांदा साठी विशेष श्रमिक रेल्वे रवाना झाली. यावेळी सर्व प्रवाशांची भेट घेऊन त्यांना सोशल डिस्टेसिंगचे पालन करण्यास सांगितले. माझी प्रार्थना आहे की, लवकरात लवकर कोरोना से संकट संपावे आणि हो लोक परत महाराष्ट्रात आपल्या कामावर यावेत. 

याशिवाय अबू आझमी यांचे ट्विट देखील आढळून आले. 

आम्हाला अबू आझमींच्या समक्ष वडाळा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याची बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आढळून आली नाही. याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला अबू आझमी यांचे 17 मे रोजीचे एक ट्विट आढळून आले, ज्यात त्यांनी स्क्रिनशाॅट शेअर करत म्हटले आहे की या दोन महानुभवांना माझ्या व्हिडिओमध्ये पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा दिल्याचे एेकू येत आहे. महामारी से लढायचे सोडून यांना फेक न्यूज पसरवून हिंदू- मुस्लिम भांडण लावायचे आहे. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ट्विटर अॅडमिनिस्ट्रेशन, आणि सायबर सेलला देखील टॅग केले आहे. 

अर्काइव्ह

याशिवाय या संदर्भात आझमी यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, 14 मे रोजी छत्रपती शाहू टर्मिनवरुन स्टेशनवरुन उत्तर प्रदेशातील बांदा येथे जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे रवाना झाली. यावेळी अबू आजमी यांच्या नावाच्या शिवाय मुंबई पोलिसांच्या जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याच दरम्यान लाॅकडाऊनमध्ये मजुरांसाठी काम करण्या-या शाजिदभाई यांच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. कुणीतरी खोडसाळपणाने ही व्हिडिओ क्लिप एडिट केली आहे. यासंदर्भात सरकारने कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली आहे. 
आम्हाला ओरिजनल व्हिडिओ देखील टिकटाॅकवर आढळून आला. या व्हिडिओची गती थोडी कमी करुन बारकाईने एेकला असता यात मुंबई पुलिस जिंदाबाद म्हटल्यानंतर लगेच शाजिदभाई जिंदाबाद अशी घोषणा एेकू येते. 

https://vm.tiktok.com/TQ2Wh9/

यावरुन हेच स्पष्ट होते की, अबू आझमी यांच्या व्हिडिओ संदर्भात भ्रामक दावा व्हायरल झाला आहे. 
Source- Facebook, Twitter, Google
Result- Misleading/partly false


(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular