Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या जनविश्वास रॅलीत जमलेल्या गर्दीची छायाचित्रे.
Fact
ही छायाचित्रे 3 मार्च 2024 रोजी झालेल्या जनविश्वास रॅलीशी संबंधित नाहीत. पाटण्यातील गांधी मैदानातील ही छायाचित्रे 2017 सालची आहेत.
3 मार्च 2024 रोजी पाटणा येथे गांधी मैदानावर झालेल्या जनविश्वास रॅलीत जमलेल्या गर्दीची असे सांगत दोन छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की पाटणा येथील गांधी मैदानाचे हे चित्र सात वर्षे जुने आहे आणि ते आजचे म्हणून व्हायरल करण्यात आले आहे.
पाटणा मध्ये झालेल्या जण विश्वास रॅलीच्या दरम्यान एक व्हेरीफाईड X अकाऊंटने ही पोस्ट शेअर केली आहे. छायाचित्रांसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘पटना का गांधी मैदान आज…अभूतपूर्व.. थोड़ी देर में तेजस्वी के साथ दिखेंगे राहुल गांधी और अखिलेश यादव।’ यासोबतच ‘जनविश्वास_महारॅली’ हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, रविवार 3 मार्च 2024 रोजी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर एका मोठ्या सार्वजनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेल्या रॅलीने विरोधी गटाची ताकद दाखवून दिली. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह लालू प्रसाद, तेजस्वी यादव, सीताराम येचुरी आणि डी राजा यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते.
या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, सर्वप्रथम आम्ही दोन्ही चित्रांचे Google रिव्हर्स इमेज सर्च केले, परिणामी आम्हाला 27 ऑगस्ट 2017 रोजी टाइम्स ऑफ इंडियाच्या फेसबुक पेजने शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये समान चित्रे आढळली. टाईम्स ऑफ इंडियाने केलेल्या फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये या छायाचित्रांचे वर्णन राष्ट्रीय जनता दलाच्या रॅलीत जमलेली गर्दी असे करण्यात आले आहे.
जुळणी केल्यावर, आम्हाला आढळले की दाव्यासह शेयर केलेली प्रतिमा टाइम्स ऑफ इंडियाने शेअर केलेल्या प्रतिमेसारखीच आहे.
तथापि, दुसऱ्या चित्राशी तुलना केल्यावर, आम्हाला आढळले की ते 2017 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाने शेअर केलेल्या चित्रासारखे आहे, परंतु त्यातील काही भाग बदललेला दिसतो. दाव्यात शेयर केलेले चित्र टाइम्स ऑफ इंडियासोबत शेअर केलेल्या चित्रापेक्षा जास्त गर्दी दर्शवते.
पुढे तपास करताना, आम्हाला 28 ऑगस्ट 2017 रोजी ‘इकॉनॉमिक टाईम्स‘ ने प्रकाशित केलेला एक रिपोर्ट सापडला ज्यामध्ये 2017 मध्ये राष्ट्रीय जनता दलाने आयोजित केलेल्या ‘भाजप भगाओ, देश बचाओ रॅली’ नंतर लालू प्रसाद यादव यांनी रॅलीतील गर्दीचे एडिटेड चित्र शेयर केले होते. रिपोर्टमध्ये पाहायला मिळाले की ANI ने शेअर केलेला फोटो लालू प्रसाद यादव यांनी 2017 मध्येच एडिट केला होता आणि शेअर केला होता. दाव्यासोबत शेअर केलेला फोटो देखील तोच एडिटेड फोटो आहे, जो लालू प्रसाद यादव यांनी 2017 साली शेअर केला होता.
यावरून हे दोन्ही चित्रे जुनी असून 3 मार्च 2024 रोजी झालेल्या जनविश्वास रॅलीशी संबंधित नसल्याचे स्पष्ट होते.
पुढील तपासात, आम्ही संबंधित कीवर्डसह Google शोध घेतला. परिणामी आम्हाला त्याच चित्रासह 27 ऑगस्ट 2017 रोजी फायनान्शियल एक्सप्रेसने प्रकाशित केलेला रिपोर्ट प्राप्त झाला. ‘पटना के गांधी मैदान में भाजपा भगाओ, देश बचाओ रैली में अभूतपूर्व भीड़’ या मथळ्यासह प्रकाशित झालेल्या या वृत्तात लालू यादव यांनी पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित केलेल्या रॅलीची छायाचित्रे असल्याचे म्हटले आहे.
आमच्या तपासणीतून, आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की, सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो 3 मार्च 2024 रोजी झालेल्या जनविश्वास रॅलीशी संबंधित नाही. पाटण्यातील गांधी मैदानातील ही छायाचित्रे 2017 सालची आहेत. यातील एक चित्र एडिटेडही आहे.
Sources
Facebook post by Times of India on 27th August 2017.
Report published by Financial Express on 27th August 2017.
Report published by The Economic Times
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025
Vasudha Beri
July 1, 2025