Tuesday, October 8, 2024
Tuesday, October 8, 2024

HomeFact Checkजास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात? जाणून घ्या...

जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात? जाणून घ्या सत्य

Claim –  कोरोना व्हायरस पेक्षा जास्त पीएच असलेल्या क्षारयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने COVID-19 चे रुग्ण बरे होतात.

सोशल मीडियात सध्या एक  कोरोना व्हायरस पासून बरे झालेल्या रुग्णांच्या अनुभवांचा एक मॅसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की कोरोना व्हायरसचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते त्या पेक्षा जास्त पीच असणारे क्षारयुक्त पदार्थ उदा- लिंबू, चुना, अव्होकाडोस, लसूण, आंबा, टेंजरिन पिवळ्या रंगांची रानटी फुलझाडे, संत्रा यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून रुग्ण बरा होऊ शकतो. 

Verification- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता फेसबुक वर याच दाव्याचे अनेक पोस्ट दिसून आल्या. ज्यात कोरोना विषाणूचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असल्याचे म्हटले आहे. तर वर नमूद केलेल्या फळांमध्ये त्यापेक्षा जास्त पीएच (सामू) असल्याचे म्हटले आहे.

https://www.facebook.com/amol.mayekar.79/posts/3657606080977708

आम्ही गूगलमध्ये कोविड-19 पासून ब-या झालेल्या रुग्णांच्या बाबत काही माहिती मिळतेय का याचा शोध घेतला पण आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित माहिती आढळून आली नाही. यानंतर आम्ही पुणे येथील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डाॅ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या बाबतीत व्हायरल होत असेलेल्या मॅसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही. सरकारी हाॅस्पिटमध्ये रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याला औषधे किंवा इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे पोस्ट मध्ये उल्लेख केलेल्या फळांबाबतच्या मॅसेजला काही शास्त्रीय आधार नाही,कारण कोरोनाला पीएच नसतो. त्यामुळे या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती पूर्णतः अवैज्ञानिक आहे.  जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करत असलेले विषाणूशास्त्राचे तज्ज्ञ ओयेवाले टोमेरी यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाला पीएच म्हणजे सामू नसतो. त्यामुळे व्हायरल दावा साफ खोटा आहे. 
पीएच ला मराठी सामू म्हणतात. पीएच मोजण्याची मर्यादा 0 ते 14 एवढी आहे मात्र पोस्टमध्ये काही फळाचा झाडपाल्याचा पीएच 15 पेक्षा जास्त अगती 22 पर्यत सांगितला आहे, हे अशास्त्रीय आहे. यावरुन हेच लक्षात येते की वरील फळांचे कोरोनाला मारक म्हणून सेवन करता येणार नाही. ती तुम्ही नेहमी प्रमाणे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खाऊ शकता. 

यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल पोस्टमधील माहिती खोटी असून अशा उपायांनी कोरोनाचा पेशंट बरा होऊ शकत नाही. सोशल मीडियात कोरोना उपचाराविषयी चुकीची माहिती व्हायरल झाली आहे. 

Source 
Facebook,  Google Search 
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Most Popular