विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा त्यांच्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. अनुष्काने नुकताच मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट आणि अनुष्काचा त्यांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियात शेअर होत आहे तसेच दोघांचे अभिनंदन देखील केले जात आहे.

Fact check / Verification
व्हायरल फोटो खरंच विराट कोहली आणि अनुष्का शर्माने नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या मुलीसोबत काढलेला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगल रिवहर्स इमेजच्या साहाय्याने फोटोचा शोध घेतला असता आम्हाला करिश्मा कपूर आणि संजय कंपूर यांच्यासंबंधीच्या बातमीत एक फोटो आढळून आला. जो विराट आणि अनुष्काच्या पोझसारखाच आह मात्र त्यांच्या हातातील बाळ हे मात्र व्हायरल फोटोतील बाळासारखेच दिसत आहे.

अधिक शोध घेतला असता आम्हाला हा फोटो संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्या कियान राज कपूर या मुलाचा 2010 मध्ये जन्म झाला होता त्यावेळचा आहे ही एका वेबसाईटवरील लेखामधून माहिती मिळाली. मुंबईतील ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलमध्ये तिने मुलाला जन्म दिल्याचे म्हटले आहे. अनेक वेसबाईट्सनी याच दाव्याने हा फोटो वापरला आहे. त्यामुळे हा फोटो विराट अनुष्काचा नसून करिश्मा आणि संजय कपूर यांचा आपल्या नवजात बाळासोबतचा तोही 10 वर्षांपूर्वीचा आहे हे स्पष्ट झाले.
हाच फोटो माॅर्फ करुन करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या नावाने देखील या पूर्वी व्हायरल झाला होता.

व्हायरल फोटो माॅर्फ केल्याचे आढळल्यानतंर आम्ही विराट कोहलीने आपल्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी विराटच्या ट्विटर हॅंडलला भेट दिली असता त्याचे 11 जानेवारीचे ट्विट आढळून आले. यात त्याने म्हटले आहे की, तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की, “अनुष्काने आज दुपारी मुलीला जन्म दिला आहे. आता अनुष्का आणि बाळ सुखरुप आहे. आमचे हे सौभाग्य आहे की, आम्हाला जीवनाचा हा चॅप्टर अनभवयास मिळाला. आपणास तर माहिती आहे की यावेळी आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. आपला स्नेहांकित-विराट.” मात्र विराटने टविटरवर आपल्या मुलीचा किंवा अनुष्काचा फोटो शेअर केलेला नाही.
याशिवाय आम्हाला एक इंस्टाग्राम पोस्ट आढळून ज्यात म्हटले आहे की, काल शेअर कऱण्यात आलेला फोटो विराट आणि अनुष्काच्या बाळाचा नाही.

conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो विराट आणि अनुष्काचा आपल्या बाळासोबतचा नाही, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा दहा वर्षापूर्वी त्यांच्या मुलासोबत काढलेला फोटो माॅर्फ करण्यात आला आहे.
Result- Manipulated Media
Our Sources
नवभारत टाईम्स- https://navbharattimes.indiatimes.com/movie-masti/news-from-bollywood/karisma-kapoor-set-to-marry-a-divorcee-again/articleshow/36189737.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.