Friday, September 20, 2024
Friday, September 20, 2024

HomeFact Checkआशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंह यांचे १० जून २०२२...

आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंह यांचे १० जून २०२२ रोजी निधन झाले? याचे सत्य जाणून घ्या

आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंह यांचे शुक्रवारी निधन झालंय, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने शनिवारी ११ जून २०२२ रोजी छापली होती. महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचा खाली फोटो जोडत आहे. ११ जून २०२२ रोजी पहिल्या पानावर डाव्या बाजूची थोडक्यात तर ९ व्या पानावर उजव्या बाजूची संक्षिप्त बातमी छापली होती.  

फोटो साभार : महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स पुणे या अधिकृत फेसबुक पानावर देखील त्यांनी ही बातमी शेअर केली आहे. 

फोटो साभार : Facebook/page/Maharashtra Times Pune

Fact Check / Verification

डिंको सिंह यांनी १९९८ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वर्षी म्हणजे १९९८ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंह यांचे शुक्रवारी निधन झाले, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन’ असं गुगलवर टाकले.

फोटो साभार : Google Search Result

तेव्हा आम्हांला १० जून २०२१ रोजीच्या लोकसत्ता आणि ई सकाळची बातमी आढळली. त्या बातमीनुसार, डिंको सिंह यांना २०१७ मध्ये यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. २०१९ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती, पण त्यावर त्यांनी मात केली. वयाच्या ४२ व्या वर्षी म्हणजे १० जून २०२१ रोजी बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन झाले.

फोटो साभार : Loksatta

बॉक्सर डिंको सिंह यांच्या निधनानंतर त्यावेळीचे भारताचे तत्कालीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी देखील १० जून २०२१ रोजी ट्विट करून शोक व्यक्त केले होते. 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन १० जून २०२२ रोजी नाही तर एक वर्षांपूर्वी म्हणजेच १० जून २०२१ रोजी त्यांचे निधन झाले होते. 

Result : Misleading Content/Partly False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular