Authors
Claim
बांगलादेशात मुस्लिमांनी साधूच्या जटा कापून त्याला मुस्लिम बनवले.
Fact
व्हायरल दावा खोटा आहे.
काही लोक एका माणसाचे केस आणि दाढी कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बांगलादेशातील मुस्लिमांनी एका साधूच्या जटा कापून त्याला मुस्लिम बनवल्याचा दावा केला जात आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे. बेघर आणि त्रस्त लोकांना मदत करणाऱ्या बांगलादेशातील तरुणांच्या एका गटाने रस्त्यावर निराश अवस्थेत भटकणाऱ्या मुस्लिम माणसाला मदत केली. यावेळी त्यांनी त्या व्यक्तीचे लांब केस कापून आंघोळ घातली होती.
व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे एक मिनिटाचा आहे, ज्यामध्ये काही लोक एका माणसाला रस्त्यावर भटकताना पकडतात आणि नंतर त्याचे लांब केस आणि दाढी कापतात. यानंतर ते त्याला आंघोळही घालतात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पोस्ट च्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बांग्लादेश मे मुस्लिमों द्वारा एक साधु की जटा को काटकर मुसलमान बना दिया है”.
आम्हाला एका वाचकाने व्हाट्सअपवरून संदेश पाठवून हा दावा खरा आहे की खोटा असा प्रश्न विचारला आहे.
Fact Check/ Verification
न्यूजचेकरने व्हायरल व्हिडिओची तपासणी केली आणि त्याचे कीफ्रेम वापरून रिव्हर्स इमेज शोध घेतला. यादरम्यान, आम्हाला 11 नोव्हेंबर रोजी बांगलादेशी इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला व्हिडिओ सापडला, जो व्हायरल व्हिडिओची मोठी आवृत्ती आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीला पकडतात आणि नंतर त्याला जमिनीवर बसवतात आणि आधी त्याचे लांब केस आणि दाढी कापतात. मग त्याची नखे कापल्यानंतर ते त्याला आंघोळ घालतात. यानंतर त्याचे कपडे बदलले जातात. खालील व्हिडिओमध्ये, मदत करणारे लोक त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी लोकांची मदत मागतात आणि ढाक्याच्या केरानीगंजमध्ये त्यांना ही व्यक्ती सापडल्याचेही सांगतात.
यानंतर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि व्हिडिओमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे कीवर्ड शोधून बातम्यांचे रिपोर्ट स्कॅन करण्यास सुरुवात केली, परंतु आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही.
व्हिडीओ पाहून असे वाटले की हा व्हिडिओ मदत आणि माणुसकी दाखवण्यासाठी बनवला आहे. म्हणून आम्ही BANGLADESH, HUMANITY, STREET, HOMELESS, HELP असे इंग्रजी कीवर्ड वेगवेगळ्या प्रकारे एकत्र करून YouTube शोधले.
YouTube शोध दरम्यान, आम्हाला street humanity of bangladesh नावाचे YouTube खाते सापडले, जे व्हायरल व्हिडिओमध्ये दर्शविलेल्या व्हिडिओसारखे व्हिडिओ अपलोड करते. तसेच, अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला असेही आढळून आले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी तीच व्यक्ती यातील अनेक व्हिडिओंमध्ये आहे.
दरम्यान, आम्हाला या YouTube खात्यावरून 28 ऑक्टोबर 2024 रोजी अपलोड केलेल्या व्हायरल व्हिडिओची मोठी आवृत्ती सापडली. परंतु व्हिडिओच्या वर्णनात आणि शीर्षकामध्ये कोणतीही विशिष्ट माहिती देण्यात आलेली नाही, एवढेच सांगण्यात आले की या व्यक्तीला 15 वर्षांनी अंघोळ घालण्यात आली आहे.
या YouTube खात्याच्या अबाउट सेक्शनमध्ये शोध घेतल्यावर, आम्हाला त्याच्याशी संबंधित एक फेसबुक पेज देखील सापडले, जे Mahbub creation 4 नावाने आहे.
तपासादरम्यान आम्ही या फेसबुक पेजची तपासणी सुरू केली तेव्हा आम्हाला हा व्हिडिओ 26 ऑक्टोबर 2024 रोजी अपलोड केलेला आढळला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की “त्याने त्यांना आंघोळ करून स्वच्छ केले आहे, त्यांची बदनामी किंवा त्रास देण्यासाठी नाही तर त्यांच्या भल्यासाठी”.
यानंतर आम्हाला हा व्हिडिओ 1 नोव्हेंबर 2024 रोजी त्याच खात्यावर पुन्हा अपलोड केलेला आढळला. यावेळी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की “आम्हाला या व्यक्तीचे कुटुंब सापडले आहे, परंतु आता आम्ही ही व्यक्ती शोधू शकत नाही आणि ती व्यक्ती सापडल्यावर कृपया आमच्याशी संपर्क साधा”.
शोधल्यावर, आम्हाला 9 नोव्हेंबर 2024 रोजी त्याच Facebook खात्यावरून लाइव्ह केलेला व्हिडिओ देखील सापडला. या व्हिडिओमध्ये तोच व्यक्ती उपस्थित होता, जो व्हायरल व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती म्हणताना दिसत आहे की, त्याचा व्हिडिओ भारतात शेअर केला जात असून त्याने एका हिंदू संताला जबरदस्तीने मुस्लिम बनवले आहे, असे सांगितले जात आहे. पण ही शरमेची बाब आहे, धर्माच्या आधारावर आपण कधीच कोणाची मदत करत नाही. तर आम्ही मदत केलेली व्यक्ती मुस्लिम कुटुंबातील आहे.
यानंतर आमच्या तपासात आम्ही Mahbub creation 4 चे महबूब सरकार यांच्याशी संपर्क साधला. संभाषणात व्हायरल दाव्याचे खंडन करताना ते म्हणाले, “मी आणि माझी टीम अनेकदा बेघर आणि गरीब लोकांना मदत करतो. “ते विशेषत: मानसिकदृष्ट्या अस्वस्थ लोकांना मदत करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा एकत्र येण्यास मदत करतात.”
त्यांनी सांगितले, “आम्हाला हा व्यक्ती ढाक्यातील केरानीगंज भागात दीड महिन्यांपूर्वी सापडला. त्या काळात आम्ही त्याला साफसफाईसाठी मदत केली. यानंतर आम्ही हा व्हिडिओ शेअर केल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ पाहून आमच्याशी संपर्क साधला. यावेळी आम्हाला कळाले की, त्या व्यक्तीचे नाव रजाउल करिब असून तो मुस्लिम कुटुंबातील आहे. पण ती व्यक्ती पुन्हा गायब झाली. आम्ही आणि त्याचे कुटुंबीय त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.”
Conclusion
आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल दावा खोटा आहे. बांगलादेशातील काही तरुणांनी रस्त्यावर फिरणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीचे केस कापून त्याला स्वच्छ केले होते.
Result: False
(न्यूजचेकर बांगलादेश आणि न्यूजचेकर बांगला यांच्या इनपुटसह)
Our Sources
Video uploaded by Street Humanity of Bangladesh youtube account on 28th oct 2024
Videos by Mahbub creation 4 facebook account
Telephonic Conversation with Mahbub Sorkar
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा