Saturday, July 20, 2024
Saturday, July 20, 2024

HomeFact Checkऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग यांचे कौतुक करताना हे विधान केले होते...

ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग यांचे कौतुक करताना हे विधान केले होते का? व्हायरल ग्राफिक संपादित

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदी साठी अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)

ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.हा दावा दैनिक भास्करच्या एका कथित पोस्टद्वारे करण्यात आला आहे,त्यानुसार ऋषी सुनक म्हणाले की,भारताला योग्य दिशा देण्यासाठी आणि घसरत चाललेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानांची गरज आहे.ही पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

Courtesy:Twitter@yuva_rajad
Courtesy:Facebook/koushikkahin
Courtesy:Twitter@TheRealSnehaa

Fact Check/Verification

ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग यांच्याबाबत असे विधान खरेच केले आहे का?हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रथम Google वर कीवर्डच्या मदतीने सर्च केले.परंतु आम्हाला अशी कोणतीही विश्वासार्ह बातमी सापडली नाही ज्यात सुनकचे असे कोणतेही विधान नमूद केले गेले आहे.सुनकने असे विधान केले असते,तर त्याच्याबद्दलच्या सर्व बातम्या इंटरनेटवर उपलब्ध झाल्या असत्या.

आम्ही ऋषी सुनक यांचे सोशल मीडिया अकाउंटही तपासले.पण तिथेही सुनक यांची अशी कोणतीही पोस्ट आम्हाला सापडली नाही ज्यात त्यांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला असेल. याशिवाय या दाव्यासह व्हायरल होत असलेला दैनिक भास्करचा स्क्रीनशॉटही खोटा असल्याचे तपासादरम्यान आढळून आले आहे.

वास्तविक,दैनिक भास्करने 25 ऑक्टोबर रोजी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये व्हायरल पोस्टमध्ये तेच ग्राफिक पाहिले जाऊ शकते.ट्विट असलेल्या ग्राफिकमध्ये ऋषी सुनक आणि मनमोहन सिंग यांची छायाचित्रेही पाहता येतील.पण दैनिक भास्करच्या ट्विटच्या ग्राफिकमध्ये लिहिलेला मजकूर हा व्हायरल पोस्टच्या मजकुरापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.या ग्राफिकमध्ये लिहिले आहे,”चिदंबरम-थरूर यांचा सल्ला,भारतातही अल्पसंख्याक पंतप्रधान असावेत:भाजप म्हणाला- मनमोहन सिंग विसरलात.”

म्हणजेच एडिटिंग सॉफ्टवेअरच्या साहाय्याने या ग्राफिकचा मजकूर दुसऱ्या मजकुरामध्ये बदलण्यात आला आहे.वास्तविक,दैनिक भास्करच्या वृत्तात काँग्रेस नेते शशी थरूर आणि पी चिदंबरम यांच्या वक्तव्याबाबत सांगण्यात आले.अमेरिका आणि ब्रिटनच्या लोकांप्रमाणे भारतानेही अल्पसंख्याकांना सत्तेत आणले पाहिजे,असे ते म्हणाले होते.

मनमोहन सिंग यांच्याबद्दल ऋषी सुनक यांनी दिलेल्या अशा कोणत्याही कथित वक्तव्यावर दैनिक भास्करने कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.याला दैनिक भास्करचे राष्ट्रीय संपादक एल.पी. पंत यांनीही दुजोरा दिला आहे.त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल होणारे हे ग्राफिक पूर्णपणे बनावट आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टबाबत आम्ही ऋषी सुनक यांच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्याकडून काही प्रत्युत्तर आल्यास ते बातमीत अपडेट केले जाईल.

Conclusion

एकंदरीत,दैनिक भास्करच्या संपादित ग्राफिकच्या माध्यमातून असा दावा करण्यात आला आहे की,ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग यांचे कौतुक करत भारताला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज असल्याचे म्हटले आहे.

Result: Altered Photo

Our Sources

Tweet of Dainik Bhaskar, posted on October 25, 2022
Quote of LP Pant, National Editor, Dainik Bhasker

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular