Authors
Claim
बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडले.
Fact
नाही, हे मांस मेंढ्यांचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावर ठेवलेल्या काही शिपमेंटच्या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, राजस्थानहून बेंगळुरूला आणलेले 14 हजार किलो कुत्र्याचे मांस बेंगळुरू रेल्वे स्थानकावर जप्त करण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडिओ सुमारे एक मिनिटाचा आहे, ज्यामध्ये काही पांढऱ्या रंगाचे पॅकेज रेल्वे स्टेशनवर आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांगते की, अब्दुल रज्जाक नावाचा एक व्यक्ती कर्नाटकातील हॉटेल्समध्ये कुत्र्याचे मांस पुरवतो.
हा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे, ज्यात लिहिले आहे की, “कर्नाटकमध्ये 14 टन कुत्र्याचे मांस पकडले आहे. राजस्थानहून बेंगळुरूला आणलेले 14 हजार किलो कुत्र्याचे मांस बेंगळुरू रेल्वे स्टेशन मॅजेस्टिकजवळ जप्त करण्यात आले. बेंगळुरूचा मांस व्यवसाय पूर्णपणे मुस्लिम नेते अब्दुल रझाक यांच्या हातात आहे.
Fact Check/ Verification
न्यूजचेकर ने सर्वप्रथम किवर्ड सर्चच्या माध्यमातून याबद्दल तपास केला. आम्हाला आजतक ने प्रसिद्ध केलेली 27 जुलै 2024 रोजीची बातमी सापडली.
बातमीनुसार, 26 जुलै रोजी जयपूरहून बेंगळुरू सिटी रेल्वे स्टेशनवर तीन टन मांसाची आवक झाली होती, त्यानंतर बेंगळुरूचे गोरक्षक पुनीत केरेहल्ली यांनी मागवलेले मांस कुत्र्याचे असल्याचा दावा केला. यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (एफएसआय) अधिकारी स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी मांसाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले.
मात्र, यावेळी मांस विक्रेते अब्दुल रज्जाक यांनी कुत्र्याचे मांस असल्याचा दावा फेटाळून लावत ते कुत्र्याचे मांस नसून मेंढीचे मांस असल्याचे सांगितले होते. यासाठी आमच्याकडे कायदेशीर कागदपत्रेही आहेत आणि पुनीत केरेहल्लीला खोटे आरोप करून पैसे कमवायचे आहेत. असा आरोप केला.
दरम्यान, आम्हाला 28 जुलै 2024 रोजी टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील सापडला. यामध्ये असेही सांगण्यात आले आहे की जयपूरहून सुमारे 2700 किलो मांस बेंगळुरू सिटी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते, त्यानंतर गोरक्षक पुनीत केरेहल्ली यांनी ते कुत्र्याचे मांस असल्याचा दावा करून व्हिडीओ प्रसारित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन एफआयआर नोंदवले होते. कुत्र्याचे मांस असल्याच्या संशयावरून मांस विक्रेत्याविरुद्ध पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफएसआय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी पुनीत केरेहल्ली यांच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला होता. याशिवाय, गर्दी जमवल्याबद्दल पुनीत आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तिसरा एफआयआर दाखल करण्यात आला होता.
तथापि, या रिपोर्टमध्ये अन्न सुरक्षा आयुक्त के श्रीनिवास यांचे विधान देखील आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की “बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे मांस विकले जात नाही आणि ट्रेनमधून मागवलेले मांस ‘शेवॉन’ म्हणजेच बकरीचे मांस होते. राजस्थान आणि गुजरातमधील कच्छ-भुज भागात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या ‘सिरोही’ या खास जातीच्या शेळीचे हे मांस होते. त्यांच्या शेपट्या किंचित लांब असतात आणि त्यावर डाग असतात, म्हणून काही लोक गोंधळात पडू शकतात. मात्र, तपासणीसाठी आणलेल्या नमुन्यांमध्ये कुत्र्याच्या मांसाचे कोणतेही अंश आढळले नाहीत. शेळीच्या मांसाचा पुरवठा कमी असल्याने काही व्यापारी विविध राज्यांतून आयात करून येथे कमी दरात विक्री करतात.”
याशिवाय द न्यूज मिनिटच्या वेबसाईटवर या संदर्भात प्रसिद्ध झालेला रिपोर्टही आम्हाला आढळला. यात असे सांगण्यात आले आहे की, “कर्नाटक आरोग्य विभागाने हे मांसाचे पार्सल ICAR-नॅशनल मीट रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबादला चाचणीसाठी पाठवले होते, त्यानंतर 30 जुलै रोजी त्याचा अहवाल आला आणि ही चाचणी आण्विक बायोमार्कर विश्लेषणाद्वारे करण्यात आली हे मांस मेंढ्याचे असल्याचे आढळून आले.” याशिवाय, या रिपोर्टमध्ये त्या व्यक्तीचे छायाचित्र देखील आहे, जो व्हायरल व्हिडिओमध्ये कुत्र्याचे मांस असल्याचा आरोप करताना दिसत आहे. या वृत्तात या व्यक्तीचे नाव पुनीत केरेहल्ली असे नमूद करण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त, आम्हाला या संदर्भात कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी 31 जुलै 2024 रोजी केलेले ट्विट देखील आढळले, ज्यामध्ये ICAR-National Meat Research Institute हैदराबादचा अहवाल शेअर करताना त्यांनी लिहिले की “रेल्वे स्टेशनवर आणलेले मांस, बेंगळुरू मध्ये सापडलेले मांस मेंढ्यांचे होते. याशिवाय त्यांनी लोकांना अफवा टाळण्याचे आवाहनही केले.
ICAR-नॅशनल मीट रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबादने 30 जुलै रोजी जारी केलेल्या अहवालात, मॉलिक्युलर बायोमार्कर ॲनालिसिस (DNA) पद्धतीने केलेल्या तपासणीत हे मांस मेंढ्यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल तुम्ही खाली पाहू शकता.
Conclusion
आमच्या तपासणीत सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल दावा खोटा आहे आणि बेंगळुरू सिटी रेल्वे स्टेशनवर आणलेले मांस मेंढ्यांचे होते.
Result: False
Our Sources
Tweet by Karnataka Health Minister on 31st July 2024
Article by AAJ TAK on 27th July 2024
Article by Times of India on 28th July 2024
Article by The News Minute on 31st July 2024
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिन्दीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा