Monday, July 22, 2024
Monday, July 22, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap : या आठवड्यात पुरात गाडी वाहून जाण्यापासून ते केंद्र सरकारने...

Weekly Wrap : या आठवड्यात पुरात गाडी वाहून जाण्यापासून ते केंद्र सरकारने शाळेच्या पुस्तकांवर जीएसटी लावल्यापर्यंतच्या काही मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी

पुराच्या पाण्यात गाडी वाहून जाण्याचा व्हिडिओ नांदेडमधील आहे. तसेच केंद्र सरकारने शाळेच्या पुस्तकांवर जीएसटी लावलाय, असा दावा केला जात होता. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. न्यूजचेकरने या आठवड्यात अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही ते सविस्तरपणे इथे वाचू शकता.

पुराच्या पाण्यात गाडी वाहून जाण्याचा व्हिडिओ खरंच नांदेडमधील आहे? चुकीचा दावा व्हायरल 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जातोय की, हा व्हिडिओ नांदेडमधील हिमायतनगरचा आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला खरंच ‘जगातील सर्वोत्कृष्ट २०२२’ म्हणून घोषित केलंय? याचे सत्य जाणून घ्या 

युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला ‘जगातील सर्वोत्कृष्ट २०२२’ म्हणून घोषित केल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

इस्रोने रेडिओ गार्डन खरंच विकसित केलंय? भ्रामक दावा व्हायरल  

इस्रोने रेडिओ गार्डन विकसित केल्याचा दावा केला जात होता. पण हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

नुपूर शर्माचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आताचा सांगत शेअर केला जातोय, जाणून घ्या याचे सत्य काय आहे

नुपूर शर्माचा नुकताच एक नवा व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जात होता. पण हा व्हिडिओ जुना असल्याचे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

केंद्र सरकारने शाळेच्या पुस्तकांवर खरंच जीएसटी लावलाय? याचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर एक मेसेज शेअर करत दावा केलाय की, केंद्र सरकारने शाळेच्या पुस्तकांवर जीएसटी लावलाय. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular