Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा

Claim
कॅनडा सरकारने आरएसएस संघटनेवर बंदी घातली आहे.

Fact
हा दावा खोटा आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम (NCCM) या संस्थेने केलेल्या मागण्या हा सरकारी निर्णय असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे.

नुकत्याच झालेल्या भारत-कॅनडा राजकीय वादा दरम्यान सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. व्हायरल दावा असा आहे की “कॅनडा सरकारने हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर बंदी घातली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले आहेत”. हा दावा एका व्हिडिओसह व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कॅनडामध्ये आरएसएसवर बंदी घालण्यासह तीन मागण्या करत आहे.

18 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या देशाच्या संसदेत निवेदन देताना आरोप केला की, शीख नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकार असू शकते आणि त्यांची एजन्सी त्याची चौकशी करत आहे. या विधानानंतर कॅनडाने भारताचे सर्वोच्च मुत्सद्दी पवन कुमार राय यांची हकालपट्टी केली. भारतानेही कॅनडाच्या उच्चायुक्ताला आणि एका उच्च राजनैतिकाला पाच दिवसांत देश सोडण्यास सांगितले. तसेच भारताने कॅनडाचे हे आरोप निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

याच क्रमाने व्हायरल होत असलेल्या दाव्यासह शेअर करण्यात आलेला व्हिडिओ सुमारे 1 मिनिटाचा आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती इंग्रजीत बोलताना ऐकली आहे, ज्याचा मराठी अनुवाद आहे, “आम्ही NCCM च्या वतीने चार अतिरिक्त मागण्या करत आहोत. प्रथम, भारतातून कॅनडाच्या राजदूताला तातडीने परत बोलावण्यात यावे. दुसरे, भारताचे राजदूत आणि कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्या हकालपट्टीची कार्यवाही लवकरच सुरू करावी. तिसरे, भारत आणि कॅनडा यांच्यातील व्यापारावर अधिकृतपणे बंदी घालण्यात यावी. चौथे, फौजदारी संहितेनुसार RSS वर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि त्याच्या सदस्यांना कॅनडातून निर्वासित करावे या मागणीसाठी आम्ही WSO मध्ये सामील आहोत.”

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी, न्यूजचेकरने प्रथम सोबतच्या व्हिडिओची तपासणी केली. यासाठी, जेव्हा आम्ही शेअर होत असलेल्या व्हिडिओकडे काळजीपूर्वक पाहिले तेव्हा आम्हाला @nccmuslims नावाच्या TikTok अकाउंटचा वॉटरमार्क आढळला.

यावरून सुगावा घेऊन तपासादरम्यान, आम्ही NCCM संदर्भात शोध घेतला. किवर्ड सर्च केल्याने आम्हाला NCCM चे फेसबुक पेज मिळाले आणि 19 सप्टेंबर रोजी शेअर केलेली एक पोस्ट सापडली, ज्यामध्ये सर्व समान मागण्या होत्या. ज्या वर लिहिलेल्या आहेत.

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा
Courtesy: Facebook/ NCCM

याशिवाय, 18 सप्टेंबर 2023 रोजी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये उपलब्ध माहितीनुसार, शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येसंदर्भात 19 सप्टेंबर रोजी NCCM आणि WSO ने कॅनडाच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये पत्रकार परिषद घेतली होती.

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा

तपासादरम्यान, आम्हाला NCCM च्या YouTube खात्यावर 20 सप्टेंबर 2023 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ देखील आढळला. व्हायरल व्हिडीओतील दृष्य 5 मिनिटांनंतर या व्हिडीओत पाहता आणि ऐकता येते.

यावेळी, आम्ही NCCM ची वेबसाइट देखील शोधली आणि त्यांच्या आमच्याबद्दल या विभागात संस्थेशी संबंधित माहिती मिळाली. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम (NCCM) ही एक स्वतंत्र, पक्षपाती आणि ना-नफा तत्वावर कार्यरत संस्था आहे. त्याचे सदस्य कॅनेडियन मुस्लिम आहेत आणि देशातील मुस्लिम समुदायाच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. त्याचे मुख्यालय कॅनडाची राजधानी ओटावा येथे आहे.

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा
Screengrab of NCCM website

आमच्या तपासात, हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती एनसीसीएमचे सीईओ स्टीफन ब्राउन आहे, ज्याने कॅनडाच्या सरकारकडे शीख नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येप्रकरणी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच, त्यांची संस्था ही पूर्णपणे ना-नफा संस्था आहे आणि तिचा कॅनडा सरकारशी कोणताही संबंध नाही.

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा
Screengrab of NCCM website

यानंतर आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि कॅनडाच्या सरकारने आरएसएसवर बंदी घालण्यासंदर्भात काही आदेश दिले आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या काळात अशी कोणतीही विश्वसनीय बातमी आम्हाला आढळली नाही. तसेच, आम्हाला या संदर्भात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे कोणतेही विधान आढळले नाही.

आमच्या तपासाला बळकटी देण्यासाठी आम्ही RSS ची विदेशी शाखा असलेल्या हिंदू स्वयंसेवक संघ (HSS) च्या कॅनेडियन कार्यकर्त्यांशीही संपर्क साधला आहे. त्यांचा प्रतिसाद आल्यावर लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम (NCCM) या संस्थेने केलेल्या मागण्या हा सरकारी निर्णय असल्याचे सांगून व्हायरल दावा दिशाभूल करीत असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.

Result: False

Our Sources

Facebook Post of NCCM
Youtube Video of NCCM
Information on NCCM Website


(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी आणि पंजाबी ने ही केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in न्यूजचेकरचे चॅनल WhatsApp वर Live चालू आहे.

Most Popular