Sunday, April 28, 2024
Sunday, April 28, 2024

HomeFact Checkकाॅंग्रेसने इशरत जहाॅंच्या नावाने नाही सुरु केली अम्बुलेंस सेवा, खोटा दावा व्हायरल 

काॅंग्रेसने इशरत जहाॅंच्या नावाने नाही सुरु केली अम्बुलेंस सेवा, खोटा दावा व्हायरल 

Claim

महाराष्ट्रात काॅंग्रेसने नुसरत जहां नावाने अॅम्बुलंस सेवा सुरु केली आहे.

Verification
सध्या सोशल मीडियामध्ये एक पोस्ट व्हायरल होत असून यात दावा केला आहे की काॅंग्रेसने महाराष्ट्रात इशरत जहां च्या नावाने अॅम्बुलंस सुरु केली आहे. उद्या हे याकूब मेमन आणि अफजल गुरूसारख्या दहशतवाद्यांच्या नावाने देखील सुरु करतील तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका. आम्हाला यांच काही देणंघेणं नाही कारण आम्हाला तर कांदे स्वस्त पाहिजेत. अशी मार्मिक टिप्पणी देखील या पोस्टमध्ये करण्यात आली आहे.
आम्ही काही किवर्ड्स आधारे इशरत जहां च्या नावाने सुरु करण्यात आलेल्या या सेवेबद्दल गूगलमध्ये शोध घेतला असता याबद्दलच्या अनेक तीन वर्षापूर्वीच्या अनेक बातम्या दिसून आल्या.
याशिवाय आम्हाला मिड-डे या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर 14 मार्च 2016 रोजी प्रकाशित झालेली बातमीही मिळाली. या बातमीत म्हटले आहे की, गुजरात हायकोर्टाने इशरत जहांला निर्दोष घोषित केल्यानंतर 2011 मध्ये ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील नागरिकांनी माय मुंब्रा फाउंडेशनच्या सहयोगाने वर्गणी गोळा करुन इशरत जहां च्या नावाने ही अॅम्बुलंस सेवा सुरु केली होती पण आता ही काही तांत्रिक कारणाने ही सेवा बंद करण्यात आली आहे.
याशिवाय तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही सेवा बंद व्हावी असे म्हटल्याची बातमी दैनिक जागरण या हिंदी दैनिकाने दिली होती.
मुंब्र्याचे माजी नगरसेवक रऊफ लाला अफजल यांच्या म्हणण्यानुसार ही सेवा जानेवारी 2016 रोजी बंद झाली. या सेवेची देखरेख लोकांनी नीट केल्याने सेवा बंद करण्याचे कारण सांगण्यात आले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की कांग्रेसने इशरत जहांच्या नावाने ही अॅमेबलेंस सेवा सुरु केली नव्हती तर मुंब्रातील माय मुंब्रा फाउंडेशनने लोकांच्या सहभागातून ही सेवा 2011 मध्ये सुरु केली होती ती 2016 मध्येच बंद झाली. सोशल मीडियात ही माहिती चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल केली जात आहे.
Tools Used 
Google Search
Facebook Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular