Monday, April 29, 2024
Monday, April 29, 2024

HomeFact Checkगृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले...

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का?

Claim

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे.

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का?
Courtesy: Facebook/ Hemant Angle

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का?

Fact

गुप्तचरानुसार, पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताकडून बदला घेण्याची मागणी चीनकडे केली आहे. भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके भरले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साईड वायूला विषारी आहेत. याशिवाय, भारतात, डोळ्यांच्या आजारांच्या विकासासाठी विशेष प्रकाश सजावटीचे दिवे देखील तयार केले जात आहेत. पारो मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे, कृपया या दिवाळीत जागरूक रहा आणि या चायनीज उत्पादनांचा वापर करू नका. हा संदेश सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा. जय हिंद

विश्वजित मुखर्जी, वरिष्ठ तपास अधिकारी, गृह मंत्रालय, भारत सरकार,

हा दावा फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल दावा खरा आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही गृहमंत्रालयाच्या वेबसाईटला भेट दिली मात्र आम्हाला तिथे अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही.

यानंतर आम्ही विश्वजित मुखर्जी नावाचा अधिकारी खरोखर गृह मंत्रालयात काम करत आहे की नाही? हे देखील शोधले. पण असा कोणी अधिकारी तेथे काम करत नसल्याचे आढळून आले.

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का?

व्हायरल दाव्याविषयी गृह मंत्रालयाने देखील याबाबत प्रेस नोट जारी करुन माहिती दिलेली नाही.त्यांनी जारी केलेल्या आवश्यक माहितीची यादी अनेकदा गृह मंत्रालय त्यांच्या वेबसाइटवर जारी करते.

याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला पीआयबीचे एक ट्विट आढळून आले. ज्यात गृहमंत्रालयाच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश खोटा असल्याचे म्हटले आहे.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, गृहमंत्रालयाच्या नावाने खोटा दावा व्हायरल होत आहे.

Result: False

Our Sources
Official Website of Ministry of Home Affairs
Tweet made by PIB on October 18, 2021


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular