पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2021 पासून व्यवहारांवर शुल्क आकारणी संदर्भात नियम लागू होणार आहेत. नव्या नियमांनुसार, पैसे काढण्यासाठी आणि डिपॉजिटसाठी शुल्क आकारणी लागू होईल आणि ही रक्कम पोस्ट ऑफिसमधील ग्राहकांच्या खात्याच्या स्वरुपानुसार बदलू शकते. अशा दावा करणा-या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत.
यात म्हटले आहे की, जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकांनी आता AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टम) वर शुल्क आकरण्याचा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. मूलभूत बचत खातं असल्यास महिन्यातून चार वेळा पैसे काढणं विनामूल्य आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावरील शुल्क म्हणून किमान 25 रुपये किंवा मूल्याच्या 0.50 टक्के कपात केली जाईल.
या संदर्भात आम्हाला दैनिक लोकमतची बातमी आढळून आली. यात देखील एप्रिल पासून पोस्ट खाते रक्कम जमा करणे व काढण्यावर शुल्क आकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

न्यूज 18 लोकमत ने देखील ही बातमी प्रसिद्ध केली आहे. यात म्हटले आहे की, सेव्हिंग अकाउंटमधून महिन्याला चार वेळा कॅश काढल्यास, कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये किंवा काढलेल्या एकूण रकमेच्या 0.5 टक्के शुल्क आकारलं जाईल. पैसे जमा करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.सेव्हिंग किंवा करंट अकाउंटसाठी प्रत्येक महिन्याला 25000 रुपये काढल्यास कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु त्यानंतरच्या प्रत्येक काढलेल्या एकूण रकमेपैकी 25 रुपये किंवा 0.5 टक्के शुल्क आकारलं जाईल.

याशिवाय टिव्ही 9 मराठी ने देखील हे वृत्त दिले आहे, यात म्हटले आहे की, दरमहा दहा हजारापर्यंत पैसे जमा करता येतात. त्याहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 0.50 टक्के मूल्य किंवा किमान 25 रुपये द्यावे लागतील.

Fact Check/Verification
पोस्ट खाते खरंच रकक्म काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी शुल्क आकारणी करणार आहे का यााच शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही भारतीय पोस्ट खात्याच्या वेबसाईटला भेट दिली मात्र आम्हाला तिथे अशा प्रकारची माहिती आढळून आली नाही.
यानंतर आम्ही या संदर्भात गूगल मध्ये शोध घेतला असता आम्हाला टिव्ही 9 मराठीची बातमी आढळून आली, ज्यात म्हटले आहे की, पोस्टात पैसे भरणे किंवा काढणे यावर शुल्क आकारणी करणार असल्याचा दावा खोटा आहे. बातमीत म्हटले आहे की, सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या मेसेजमध्ये पोस्ट ऑफिस 1 एप्रिलपासून खातेदारांकडून प्रत्येक रोख रक्कम काढण्यासाठी 25 रुपये वसूल करणार असल्याचं म्हटलं आहे. भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या वृत्ताचा सपशेल इन्कार केलाय. पीआयबीनं हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.
अधिक माहितीसाठी आम्ही पीआयबीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलला भेट दिली असता आम्हाला या संदर्भात ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की, 1 एप्रिल पासून शुल्क आकारणीचा दावा खोटा आहे.
याशिवाय आम्हाला रविशंकर प्रसाद यांचे देखील ट्विट आढळून आले. यात देखील पोस्ट खात्यातून रक्कम काढतान कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की भारतीय पोस्ट खात्याने रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर शुल्क आकारणी सुरु केली नसल्याची माहिती पीआयबीने ट्विटरवर दिली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये आकारणाची बातमी चुकीची आहे.
Result: False
Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.