Authors
Claim
एका गरोदर भारतीय महिलेने नुकताच सापाला जन्म दिला.
Fact
हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि सोबतचा व्हिडिओ अप्रासंगिक आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका महिलेने सापाला जन्म दिल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका विवाहित महिलेच्या फोटोशिवाय ऑपरेशन थिएटरमधील दृश्येही दिसत आहेत.
Fact Check/ Verification
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने Google वर शोधले. महिलेने सापाच्या बाळाला जन्म दिल्याच्या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही अधिकृत रिपोर्ट आम्हाला सापडला नाही.
यानंतर आम्ही न्यूजचेकर बांगलादेशचे सहकारी रिफत महमुदुल यांचीही मदत घेतली. त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ टिकटॉकवरही व्हायरल झाला आहे. ऑपरेशन थिएटरचा हा व्हिडिओ टिकटॉकवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यात दिलेल्या माहितीनुसार, तो लाहोर, पाकिस्तानचा असून 20 एप्रिल रोजी अपलोड करण्यात आला आहे.
काही कीवर्ड शोधल्यावर, आम्हाला अनेक रिपोर्ट सापडले ज्यात अशा विचित्र घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, इंडोनेशियातील एका गर्भवती महिलेने सरड्याला जन्म दिल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. या घटनेनंतर सर्व ग्रामस्थ महिलेवर नाराज झाले. या घटनेची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली, त्यानंतर ही बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
याशिवाय फॅक्ट-चेकिंग वेबसाइट Snoopes ने देखील 2017 मध्ये अशा दाव्याची चौकशी केली होती. त्यावेळी महिलेच्या पोटाच्या एक्स-रेमध्ये साप दिसल्याचा दावाही करण्यात आला होता. तपासाअंती असे आढळून आले की, व्हायरल झालेले चित्र प्रत्यक्षात डिजिटल आर्टवर्क आहे.
विज्ञानातील सिद्धांतानुसार गरोदर स्त्री रक्त-मांसाच्या मुलाला जन्म देते, पण सापांच्या बाबतीत ते वेगळे असते. ते अंड्यांद्वारे जन्म देतात. त्यामुळे मानवाने सापाला जन्म देणे जवळजवळ अशक्य आहे.
Conclusion
त्यामुळे एका भारतीय महिलेने सापाला जन्म दिल्याचा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
tiktok video
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in