Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)
इराणमध्ये जवळपास महिनाभरापासून हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. बळजबरीने हिजाब घालण्याच्या विरोधात इराणी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, एका टॉपलेस महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता इराणमधील महिला टॉपलेस होऊन हिजाबला विरोध करत असल्याचा दावा या व्हिडिओसोबत करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला लोकांच्या गर्दीत भाषण करताना दिसत आहे. महिलेने शरीराच्या वरच्या भागावर कोणतेही कपडे घातलेले नाहीत. हा व्हिडीओ शेअर करत सोशल मीडिया यूजर्स लिहित आहेत की, हिजाब काढून टाकणे, फेकणे, जाळणे यानंतर आता इराणी महिला त्यांचे कपडे काढून अंगप्रदर्शन करत आहेत.
खरं तर, महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा इराणमध्ये पोलिस कोठडीत मृत्यू झाला. 13 सप्टेंबर 2022 रोजी इराणच्या धार्मिक पोलिसांनी हिजाब व्यवस्थित न घातल्यामुळे महसाला अटक केली होती. तीन दिवसांनी पोलिस कोठडीत तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून इराणमध्ये हिजाबच्या विरोधात जबरदस्त निदर्शने सुरू आहेत. याचा निषेध म्हणून महिला हिजाब जाळत आहेत आणि केस कापत आहेत. या आंदोलनात डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. हे पाहता हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे.
काही कीवर्डच्या मदतीने व्हायरल व्हिडिओ शोधल्यावर, आम्हाला “रेडिओ जमानेह” नावाच्या सत्यापित हँडलद्वारे एक ट्विट आढळले. “रेडिओ जमानेह” हे पर्शियन भाषेतील न्यूज पोर्टल/रेडिओ स्टेशन आहे जे नेदरलँड्सची राजधानी अमस्टरडॅम येथून चालवले जाते.
व्हायरल व्हिडिओ 1 ऑक्टोबर 2022 रोजी केलेल्या “रेडिओ जमानेह” च्या या ट्विटमध्ये उपस्थित आहे. तसेच, ट्विटमध्ये पर्शियन भाषेत लिहिले आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी टॉपलेस महिला निलोफर स्टीली नावाची कलाकार आहे जी जबरदस्तीने हिजाब घालण्याची प्रथा आणि महसा अमिनीच्या मृत्यूचा निषेध करत आहे. पण ट्विटमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, नेदरलँड्सची राजधानी अमस्टरडॅममध्ये हा निषेध करण्यात आला.
“रेडिओ जमानेह” च्या पत्रकाराने 1 ऑक्टोबर रोजी अमस्टरडॅममध्ये झालेल्या निषेधाची काही छायाचित्रे देखील ट्विट केली. यातील काही छायाचित्रांमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओतील महिलाही दिसत आहे.
वास्तविक, महसा अमिनीच्या मृत्यू आणि हिजाबबाबत केवळ इराणमध्येच नव्हे तर अनेक देशांमध्ये निदर्शने सुरू आहेत. यामध्ये ब्रिटन, नेदरलँड, अमेरिकासह अनेक देशांचा समावेश आहे.
अमस्टरडॅममध्ये निलोफर स्टीली टॉपलेस झाल्याच्या बातम्या इराणी न्यूज वेबसाइट्समध्येही आल्या आहेत. या अहवालांनुसार, कवयित्री, मॉडेल आणि स्त्रीवादी निलोफर स्टीली ही एक इराणी महिला आहे जी अमस्टरडॅममध्ये राहते. तिने काही वर्षांपूर्वी इराण देश सोडला आहे.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेने टॉपलेस होऊन मेहसा अमिनीच्या मृत्यू आणि हिजाब विरोधात आपला निषेध व्यक्त केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र टॉपलेस महिलेचा हा व्हिडिओ इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाचा नसून अमस्टरडॅमचा आहे. व्हिडीओद्वारे करण्यात आलेला दावा पूर्णपणे खरा नाही.
Tweet of Radio Zamaneh, posted on October 1, 2022
Tweet of Farzad Seifikaran, posted on October 1, 2022
Irani Media Reports
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Runjay Kumar
June 18, 2025
Prasad S Prabhu
August 7, 2024
Prasad S Prabhu
May 27, 2024