पावसात मेनहोलमध्ये पडून गायब झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती पावसात छत्री घेऊन रस्ता ओलांडून येत असताना रस्त्याचा कडेला पाणी साठलेल्या मेनहोल मध्ये अचानक पडतो त्याची छत्री देखील हातातून निसटते. तो बराच वेळ होलमधून बाहेर येत नाही. यावरुन तो व्यक्ती मेनहोलमध्ये वाहून गेला की काय अशी शंका निर्माण होते.
पंधरा सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप अनेक युजर्सनी शेअर करत पावसात चालत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. आमच्या काही युजर्सनी ही व्हिडिओ क्लिप आमच्याशी व्हाट्स्अॅपवर शेअर केली असून असून याची पडताळणी करण्यास सांगितले.

Fact Check/Verification
व्हायरल व्हिडिओचे नेमके काय सत्य आहे याची पडताळणी करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता यात दिसते की हा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झालेला नाही. काही तर घडण्याच्या अपेक्षेने हा व्हिडिए शूट केला आहे. शिवाय हे शूटिंग करणारी व्यक्ती मेनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीबाबत काही प्रतिक्रिया देत नाही. खरं तर, ती व्यक्ती ज्या जागी पडली होती तिथला शाॅट घेण्यसाठी कॅमेरामन पुढे जातो. तसेच त्याची हालचाल पण संथ आहे. एखादा अपघात अचानक घडतो तेव्हा चित्रण करणारे कॅमरे हलल्याचे व कॅमेरामनच्या रिअॅक्शन देखील अनेक व्हिडिओत पाहायला मिळाल्या आहेत. मात्र इथे असे काही दिसून आलेले नाही.
याशिवाय जो व्यक्ती मेनहोल मध्ये पडला आहे तो देखील काही हालचाल करताना दिसत नाही. ब-याच वेळा पाण्यात पडणा-या व्यक्ती वाचण्याचा प्रयत्न करण्यासाठी हात हलवतात मात्र इथे असे त्या व्यक्तीने तसे केलेले नाही. तसेच ती व्यक्ती पाण्यात पडल्यानंतर आतील पाणी वेगाने उफाळून देखील बाहेर आले नाही. एखादा छोटा दगड जरी पाण्यात पडला तरी पाण्याच्या छोट्या लाटा निर्माण होतात. मात्र या क्लिपमध्ये व्यक्ती मेनहोलमध्ये पडल्यावर पाणी संथ असल्याचे दिसते.
या व्हिडिओची गती कमी करुन पाहिली असता त्या व्यक्तीच्या हातांची हालचाल मेनहोलमध्ये पडेपर्यंत एकसारखीच राहते. मेनहोलध्ये पडताना त्याच्या हातांची हालचाल तीव्र व्हायला हवी पण तसे काही घडलेले यात दिसत नाही.

व्हायरल व्हिडिओ खरा नसल्याचे यावरुन स्पष्ट झाले. याबाबत काही किवर्डसच्या साहाय्याने युट्यूबवर शोध घेतला असता असता असे व्हिडिओ तयार करण्यासाठी अॅडॉब सारख्या सॉफ्टवेअरचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाली. शिवाय असाच खड्ड्यात पडलेल्या व्यक्ती गायब कसा होतो याचा व्हिडिओ कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओ देखील CINE 24 VFX या चॅनलेवर आढळून आला.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, मेनहोलमध्ये गायब झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ खरा नाही. वीएफएक्स तंत्रज्ञानाने तसेच काही साॅफ्टवेअरच्या मदतीने असे व्हिडिओ तयार करता येतात. सोशल मीडियात सदर व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही
Result: False
Claim Review: पावसात मेनहोलमध्ये पडून गायब झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ खरा आहे. Claimed By: Viral Post Fact Check: False |
Our Sources
Cine24vfx- https://www.youtube.com/watch?v=1wRfcj3iVb8
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.