बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी ठरत असल्याच्या दाव्याने एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही.
संपूर्ण पोस्ट खालीलप्रमाणे आहे.
*बाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी*नुकत्याच WHO च्या वैज्ञानिकांकडून कडून स्पष्ट करण्यात आले की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे.प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरी मधील टॉर्चमुळे आणि बाजरीतील गर्मी मुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही. म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. खेड्यात कुठल्याही सुविधा नसताना खूप कमी लोकांना कोरोनाची लागण होत आहे.*बाजरीचे फायदे*1) *शक्ती वर्धक – बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते*.2) *बाजरी पचायला हलकी असते. त्यामुळे वजन कमी होते*.3) *हृदय विकाराचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी होत*4) *कर्बोदके, पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराची झीज भरून काढते*.5) *बाजरीतील फायबर – ज्यामुळे पाचन क्षमता सुधारते*. 6) *बाजरी खाल्याने. कब्ज, ऍसिडिटी सारख्या समस्या होत नाही*. 7) *कॅन्सर – बाजरीची भाकर खाल्याने कॅन्सर सारखे आजार होण्यापासून वाचवते*.
फेसबुकवर देखील हा दावा शेअर होत आहे.

फेसबुक पोस्ट इथे पहा


Fact Check/Verification
बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी खरंच गुणकारी आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटला भेट दिली. कोविड दरम्यान आपल्या आहारात कशाचा समावेश करावा याची माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे. यात बाजरीसह अन्य धान्य व पदार्थांचा समावेश आहे. मात्र कोणत्याही एका पदार्थाच्या किंवा विशिष्ट आहारामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते पण कोरोनाचा संसर्ग नष्ट होत नसल्याचे वेबसाईटवर स्पष्ट करण्यात आले आहे.

बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी आहे का हे जाणून घेण्यासाठी इंडियन मेडिकल इंस्टिट्यूट चे महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “बाजरी पचायला हलकी असते, तिच्यात उत्तम कार्बोहायड्रेट असतात, शक्तिवर्धक असते. हे सर्व बरोबर आहे. पण बाजरीमुळे अँटिबॉडीज निर्माण होतात हे चुकीचे आहे. अँटिबॉडीज या केवळ तो आजार झाल्यावर किंवा त्या आजाराची लस घेतल्यावरच तयार होतात. शिवाय बाजरीमुळे कर्करोग टळतो असे म्हणायला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. असे कोणतेही शास्त्रीय संशोधन आजवर अधिकृत रित्या वैद्यकीय संशोधनात आलेले नाही. अशा अवास्तव गोष्टींवर विश्वास ठेवू नये.”
Read More : युकेमधील हायब्रीड इलेक्ट्रिक बसचा फोटो बेस्टची सुधारित डबल डेकर बस म्हणून शेअर
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी ठरत असल्याच्या दाव्याने सोशल मीडियात व्हायरल झालेली पोस्ट चुकीची आहे. बाजरीच्या भाकरी मुळे केवळ काही रोकप्रतिकारशक्ती वाढू शकते मात्र कोरोनापासून पूर्ण संरक्षण मिळत नाही.
Result- Misleading
Our Source
डाॅ. अविनाश भोंडवे
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा