Sunday, July 14, 2024
Sunday, July 14, 2024

HomeFact Checkव्हिडीओ पाठवून मोबाईल आणि क्रेडिट डेबिट कार्ड हॅक करतात? खोटा आहे तो...

व्हिडीओ पाठवून मोबाईल आणि क्रेडिट डेबिट कार्ड हॅक करतात? खोटा आहे तो मेसेज

“अमित शाह यांनी मोदींना नाकारले” अशा नावाचा एक व्हिडीओ तुम्हाला येईल. तो व्हिडीओ व्हायरस आहे. त्या व्हिडीओमुळे तुमचा मोबाईल हॅक होईल. असे सांगणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाठविणारे क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅकर्स असल्याचे, हा मेसेज सांगतो. त्यामुळे अनेकजण हा मेसेज आपल्या ग्रुप्स मध्ये व्हायरल करीत आहेत. व्हाट्सअप वर सध्या या मेसेजची जोरदार चलती आहे.

"अमित शाह यांनी मोदींना नाकारले" अशा नावाचा एक व्हिडीओ तुम्हाला येईल. तो व्हिडीओ व्हायरस आहे. त्या व्हिडीओमुळे तुमचा मोबाईल हॅक होईल.
Screengrab of whatsapp viral message

याच आशयाचा मेसेज काही युजर्सनी ट्विटर वरही पोस्ट केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

फेसबुकवरही अनेकांनी यासंदर्भात पोस्ट केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

"अमित शाह यांनी मोदींना नाकारले" अशा नावाचा एक व्हिडीओ तुम्हाला येईल. तो व्हिडीओ व्हायरस आहे. त्या व्हिडीओमुळे तुमचा मोबाईल हॅक होईल.
Courtesy: Facebook/Yogesh Rege

“कृपया तुमच्या यादीतील सर्व संपर्कांना कळवा की “अमित शाह यांनी मोदींना नाकारले” नावाचा व्हिडिओ स्वीकारू नका हा एक व्हायरस आहे जो तुमच्या मोबाईलला फॉरमॅट करतो. ते खूप धोकादायक आहे. त्यांनी आज रेडिओवरून त्याची घोषणा केली. हा MSG तुम्हाला शक्य तितक्या लोकांना Fwd करा. हाय अलर्ट कृपया हा क्रमांक ब्लॉक करा. 9266600223 ते क्रेडिट/डेबिट कार्ड हॅकर्स आहेत. कृपया आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना कळवा.” असे हा मेसेज सांगतो.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact check/ Verification

आम्ही या दाव्याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला. ‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ यासंदर्भात काही माहिती मिळते का? हे आम्ही किवर्ड सर्च करून पाहिले. लोकसत्ता ने प्रसिद्ध केलेली एक बातमी आम्हाला पाहायला मिळाली. “मोदी सरकारचे काही निर्णय चुकले” असे परखड मत अमित शहा यांनी मांडल्याचे यामध्ये लिहिलेले आहे. मात्र अमित शहा यांनी थेट मोदींना नाकारल्याचे कोठेही पाहायला मिळाले नाही.

"अमित शाह यांनी मोदींना नाकारले" अशा नावाचा एक व्हिडीओ तुम्हाला येईल. तो व्हिडीओ व्हायरस आहे. त्या व्हिडीओमुळे तुमचा मोबाईल हॅक होईल.
Screengrab of Loksatta.com

यानंतर अशी घोषणा कोणत्या रेडिओवरून करण्यात आली आहे का? याचा शोध घेतला. मात्र तशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. यानंतर आम्ही व्हायरल मेसेज मध्ये देण्यात आलेल्या ‘9266600223’ या क्रमांकाबद्दल तपास केला. हा क्रमांक आम्हाला फोन कॉलसाठी अस्तित्वात नसल्याचे पाहावयास मिळाले. आम्ही या संदर्भात गुगल सर्च करून पाहिला असता, आम्हाला Brighter Kashmir या संकेतस्थळावर एक बातमी सापडली. आपण आर्मी मॅन असल्याचे सांगून एकजण फसवणूक करीत असून सदर व्यक्ती ‘9266600223’ हा क्रमांक वापरत असल्याचे आम्हाला या बातमीत वाचायला मिळाले. यावरून हा क्रमांक वेगळ्या फसवणूक प्रकरणात जोडला गेला असल्याचे स्पष्ट झाले. या क्रमांकाबद्दल सायबर पोलीस जम्मू यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल झालेली असल्याची माहितीही आम्हाला मिळाली.

"अमित शाह यांनी मोदींना नाकारले" अशा नावाचा एक व्हिडीओ तुम्हाला येईल. तो व्हिडीओ व्हायरस आहे. त्या व्हिडीओमुळे तुमचा मोबाईल हॅक होईल.
Screengrab of Brighter Kashmir

फोन करून आपण आर्मी मध्ये काम करीत आहे. असे सांगून ती व्यक्ती लूट करीत होती. समाजाकडून बँक खात्याची माहिती आणि ओटीपी मिळवून ही फसवणूक करण्यात येत होती, हे आमच्या लक्षात आले. अर्थात ‘9266600223’ या क्रमांकावरून थेट व्हिडीओ किंवा मेसेज पाठवून पैसे गायब करण्यात आल्याचे उदाहरण आम्हाला सापडले नाही.

आम्ही सायबर विषयक तज्ञ हितेश धरमदासानी यांच्याशी संपर्क साधला. एकाद्या क्रमांकावरून व्हिडीओ किंवा मेसेज पाठवून पैसे गायब करणे, मोबाईल हॅक करणे असे प्रकार होऊ शकतात का? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. ” २०२० पासून अशाप्रकारचा मेसेज पसरत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणीही तुम्हाला मेसेज अथवा व्हिडीओ पाठविला तर तुमचा फोन कॉम्प्रोमाइज होण्याचा धोका नसतो. तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास किंवा त्या लिंकद्वारे कोणतीही माहिती शेअर केल्यास किंवा ओटीपी/बँक पिन इत्यादीसारखी कोणतीही माहिती शेअर केल्यास, ती माहिती तुमच्याविरुद्ध फसवणूक करण्यासाठी वापरली जाते.” असे त्यांनी सांगितले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल होणार मेसेज पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. असा कोणताही व्हिडीओ अस्तित्वात नाही, तो आजवर कुणालाही पाठवला गेला नाही आणि तसा व्हिडीओ पाठवून कुणाचीही फसवणूक करता येत नाही किंवा फोन हॅक करता येत नाही. हे आमच्या तपासात उघड झाले आहे.

Result: False

Our Sources

News Published by Loksatta.com

News Published by Brighter Kashmir

Telephonic conversation with Cyber Expert Hitesh Dharamdasani


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular