Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
कर्नाटकात मुस्लिम समाजाकडून खुलेआम गोहत्या करतानाचा व्हिडिओ.
Fact

हा दावा खोटा आहे. केरळमधील पुलापल्ली येथे मानव-वन्यजीव संघर्षाविरोधात आंदोलनादरम्यान आंदोलकांनी वाघाने मारलेल्या गायीचे शव जीपला बांधले होते.

कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या नावावर जीपच्या वर गाय बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्नाटकात मुस्लिम समाजाचे लोक खुलेआम गायींची कत्तल करत असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मात्र, तपासाअंती आम्हाला आढळून आले की हा दावा खोटा आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकचा नसून केरळचा आहे. पुलपल्ली येथे मानव-वन्यजीव संघर्षाच्या विरोधात आंदोलकांनी गाईचे शव वनविभागाच्या जीपला बांधले होते.

17 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक गाय जीपला बांधलेली दिसत आहे. गर्दीत लोक पोलिसांच्या उपस्थितीत गायीला जीपला बांधतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे. 14 मे 2024 रोजी शेअर केलेल्या X पोस्टमध्ये व्हिडिओसह कॅप्शन असे लिहिले आहे, ‘कर्नाटक में मुस्लिम समुदाय द्वारा खुले आम गौ हत्या।’ एक्स-पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा
Courtesy: X/@Modified_Hindu9

Fact Check/ Verification

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचा तपास करण्यासाठी, सर्वप्रथम आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज शोध घेतला. यादरम्यान, आम्हाला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @wayanadview नावाच्या खात्यावर आढळला. मल्याळममध्ये लिहिलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘जेव्हा लोकांनी पुलपल्लीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेतला’ (अनुवादित).

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा

आता आम्ही ‘वायनाड’, ‘पुलपल्ली’, ‘गोहत्या’ सारख्या कीवर्डसह Google वर शोधले. यादरम्यान आम्हाला फ्री प्रेस जर्नलने 17 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. त्यानुसार, ही घटना केरळमधील वायनाड येथे घडली, जिथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त जमावाने गाईचे शव वन विभागाच्या जीपला बांधले. वाघाच्या हल्ल्यामुळे या गायीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा
Free Press Journal

17 फेब्रुवारी 2024 रोजी मनोरमाने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये पुल्लापल्ली शहरातील मानव-वन्यजीव संघर्षाच्या निषेधार्थ वाघाने मारलेली गाय वनविभागाच्या जीपला बांधली गेल्याची पुष्टी मिळते.

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा

18 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकाशित झालेल्या द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जंगलात झालेल्या हल्ल्यात वन विभागाचे पर्यवेक्षक व्हीपी पॉल मारले गेले. ज्याच्या निषेधार्थ शेकडो लोक पुलापल्ली शहरातील रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. वृत्तानुसार, यादरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. मात्र जमावाने वनविभागाची जीप अडवून तिचे नुकसान केले आणि वाघाने मारलेल्या गायीचा मृतदेह आणून जीपच्या बोनेटवर बांधल्याने तणाव आणखी वाढला.

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा

या घटनेवरील इतर प्रकाशित रिपोर्ट देखील येथे आणि येथे वाचता येतील.

Conclusion

तपासातून आम्ही असा निष्कर्ष निघतो की व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ वायनाडच्या पुलप्पल्ली येथील मानव-वन्यजीव संघर्षाच्या निषेधाचा आहे.

Result: False

Sources
Report By Free press journal, Dated: February 17, 2024
Report By On Manorama, Dated: February 17, 2024
Report By The New Indian Express, Dated: February 18, 2024
Instagram post By wayanadview, Dated: February 17, 2024

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular