Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact Checkपोलिस अधिका-याने शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना बुटाने तुडवल्याचा फोटो व्हायरल, हे आहे सत्य

पोलिस अधिका-याने शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना बुटाने तुडवल्याचा फोटो व्हायरल, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

पोलिस अधिका-याने शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना बुटाने तुडवल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. यात एक आयपीएस अधिकारी एका जमिनीवर पडलेल्या युवकाच्या मानेवर तुडवत असल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा दिल्ली पोलिसांचा खरा चेहरा आहे.

संग्रहित

संग्रहित

Fact Check / Verification

व्हायरल फोटो दिल्लीतील शेतकरी आंदोलना दरम्यानचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. व्हायरल फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला 13 मार्च 2011 रोजीचा एक लेख भडास फाॅर इंडियाच्या वेबसाईटवर आढळून ज्यात हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच या फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, , लखनौच्या हजरतगंज भागात समाजवादी पार्टीने आयोजित केलेल्या निषेधाच्या वेळी ही घटना घडली आणि डीआयजी डीके ठाकूर म्हणून पोलिस अधिका-याची ओळख पटली आहे. लेखानुसार, समाजवादी पक्षाच्या युवा संघटनेने लोहिया वाहिनीतर्फे पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना झालेल्या अटकेच्या विरोधात 9 मार्च 2011 रोजी आंदोलन केले होते.

यानंतर या प्रकरणी 17 मार्च रोजीच्या इंडियन एक्सप्रेसच्या वेबासईटवर लखनौच्या डिजींच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटो दिल्लीतील पोलिस आंदोलनादरम्यानचा नाही तर 2011 मध्ये लखनौमध्ये समाजवादी पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलना दरम्यानचा आहे.

Result – Misleading

Our Sources

Bhadas4india

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular